नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुसऱ्या राज्यांतून परतलेल्या स्थलांतरित मजुरांना, त्यांच्या घराच्या जवळपासच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 50,000 कोटी रुपयांनिशी 'गरीब कल्याण रोजगार अभियानाला' सुरुवात केली. ही योजना बिहार राज्यातल्या खगडिया जिल्यातील बेलदौर भागातील तेलिहार गावातून सुरू करण्यात आली आहे. स्थलांतरित आणि गावातील मजुरांना सशक्त बनवणे, स्थानिक पातळीवर विकासाला गती देणे आणि उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेमाकचा मुख्य हेतू आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना या अभियानाची कल्पना कशी सुचली, हेही सांगितले.
भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट
पंतप्रधान मोदी म्हणाले, मी लॉकडाउनदरम्यान एक बातमी बघितली, ही बातमी उत्तर प्रदेशातल्या उन्नावची होती. तेथे एका शाळेचे रुपांतर क्वारंटाइन सेन्टरमध्ये करण्यात आले होते. येथे शहरांतून येणाऱ्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. यावेळी अधिकांश मजूर हे दक्षीण भारतातून आले होते. हे मजूर रंग-रंगोटी आणि पीओपीच्या कामात अत्यंत एक्सपर्ट होते. मात्र, क्वारंटाइन होते. आपल्या गावासाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. हे मजूर म्हणाले, दोन वेळ खाऊन फक्त बसण्यापेक्षा, आम्हाला जे येते, त्याचा उपयोग करून घ्या, ते काम आमच्याकडून करून घ्या. यानंतर या मजूर भावंडांनी क्वारंटाइनमध्ये असतानाच संपूर्ण शाळेचा कायाकल्प करून टाकला.
या बातमीतून या मजुरांची देश भक्ती दिसून येते. त्यांच्या या कामातून मलाही प्रेरणा मिळाली. यातूनच मला आयडिया सुचली, ती गरीब कल्यान रोजगार अभियानाची. गावातील मजुरांमध्ये एवढा कौशल्य आहे, त्यांचे हेच कौशल्य आणि श्रम गावाच्या कामी आले, तर गावांचा कायाकल्प होईल. यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो. या योजनेंतर्गत 25 कामे निवडण्यात आली आहेत. या योजनेतून गावातील प्रत्येक गरज पूर्ण केली जाऊ शकते.
देशातील 116 जिल्ह्यांत योजनेची सुरुवात -पंतप्रधानांनी व्हिडिओ कॅन्फरन्सिंगच्या माध्यमाने या योजनेचा शुभारंभ केला. तसेच ही योजना बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांसाठी लागू असेल आणि याअंतर्गत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घराच्या जवळपासतच रोजगार मिळेल, असे मोदी म्हणाले. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे अनेक स्थलांतरित मजूर बेरोजगार झाले आणि त्यांना आपापल्या गावी जावे लागले आहे. अशातच या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.