शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोदी सरकार 3.0: चंद्राबाबू-नितीश यांची 'हेवी डिमांड', भाजपही ऐकायला तयार, पण ठेवली मोठी अट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 13:16 IST

आज दिल्लीत एनडीएची ठैक होत आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणते मंत्रालय? यासंदर्भात मंथन होईल. खरे तर, यावेळी बहुमत नसल्याने मंत्रालयांच्या वाटपात भाजपचे फारसे चालणार नाही. यामुळे सहकारी पक्ष भाजपवर दबाव टाकू शकतात. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने विजयाची हॅटट्रिक केली आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या सहकार्याने मोदी सरकार 3.0 स्थापन होण्याच्या तयारीत आहे. मात्र आतापासूनच एनडीएमध्ये एक प्रकारचे प्रेशर पॉलिटिक्स सुरू झाले आहे. या सरकारमध्ये महत्व मिळावे, यासाठी एनडीएतील घटक पक्ष दबावतंत्राचा वापर करताना दिसत आहेत. यातच, माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, जदयू आणि टीडीपीची नजर टॉपच्या मंत्रालयांवर असून यासंदर्भात त्यांनी भाजपसमोर आपली मागणीही ठेवली आहे.

आज दिल्लीत एनडीएची ठैक होत आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणते मंत्रालय? यासंदर्भात मंथन होईल. खरे तर, यावेळी बहुमत नसल्याने मंत्रालयांच्या वाटपात भाजपचे फारसे चालणार नाही. यामुळे सहकारी पक्ष भाजपवर दबाव टाकू शकतात. 

टीडीपी-जेडीयूची नजर टॉप टेन मंत्रालयांवर -  न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, टीडीपी आणि जेडीयूची नजर मोदी सरकारच्या टॉप टेन मंत्रालयांवर आहे. गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग, वाणिज्य, रेल्वे, कृषी, पेट्रोलियम आदी मंत्रालय मिळावे अशी या दोन्ही पक्षांची इच्छा आहे. मात्र, भाजप टॉप ५ मंत्रालये देण्यास अनुकूल नाही. मात्र या दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे की, यापूर्वीच्या आघाडी सरकारांमध्येही गृह, संरक्षण, अर्थ अशी महत्त्वाची मंत्रालये मित्रपक्षांकडे होती. याशिवाय जेडीएसचीही कृषी आणि आरोग्य मंत्रालयावर नजर आहे.

भाजपनं ठेवली अशी अट -सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या संबंधित वृत्तानुसार, एनडीएमधील मंत्र्यांचे प्रेशर पॉलिटिक्स बघता, भाजपनेही एक मोठी अट ठेवली आहे. भाजप नितीश कुणार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मागण्या मान्य करू शकते. मात्र, यासाठी भाजपने मोठी अट ठेवली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे स्वत: या मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारत असतील, तरच भाजप टॉप मंत्रालये जेडीयू आणि टीडीपीला देईल, असे भाजपने म्हटले आहे. पण, यासाठी नितीश यांना बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल आणि चंद्राबाबू नायडू यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता येणार नाही.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूBJPभाजपा