मोदी सरकार पोकळ घोषणा देणारे : गांधी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:47 AM2018-01-01T02:47:41+5:302018-01-01T02:48:03+5:30

नरेंद्र मोदी सरकार हे फक्त पोकळ घोषणा देणारे आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्ला चढवून स्मार्ट सिटीज योजनेसाठीच्या ९,८६० कोटींपैकी केवळ ७ टक्के निधीच सरकारने खर्च केला आहे, असे रविवारी म्हटले.

 Modi government announcing hollow: Gandhi | मोदी सरकार पोकळ घोषणा देणारे : गांधी  

मोदी सरकार पोकळ घोषणा देणारे : गांधी  

Next

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार हे फक्त पोकळ घोषणा देणारे आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्ला चढवून स्मार्ट सिटीज योजनेसाठीच्या ९,८६० कोटींपैकी केवळ ७ टक्के निधीच सरकारने खर्च केला आहे, असे रविवारी म्हटले.
टिष्ट्वटरवर राहुल म्हणाले की, ‘प्रिय मोदी भक्त, स्मार्ट सिटीजसाठीच्या ९,८५० कोटी रुपयांपैकी केवळ सात टक्के रक्कमच खर्च झाली आहे. चीन आमच्याशी स्पर्धा करीत असून तुमचे नेते मात्र पोकळ घोषणा देत आहेत. कृपया हा व्हिडिओ पाहा आणि त्यांना भारतासाठी जे महत्वाचे आहे (रोजगार निर्मिती) त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला द्या.’ गांधी यांनी टिष्ट्वटरसोबत ‘शेंझेंन : द सिलिकॉन व्हॅली आॅफ हार्डवेअर’ या नावाचा माहितीपटही लिंक केला आहे. सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटीज योजनेसाठीच्या निधीतील फारच कमी निधी वापरला जात असल्याच्या सरकारच्याच माहितीचा आधार घेऊन गांधी यांनी हा हल्ला केला. ६० शहरांसाठी दिल्या गेलेल्या ९,८६० कोटींपैकी फक्त ६४५ कोटी रुपयेच वापरण्यात आले, असे गृहनिर्माण आणि शहर कामकाज मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Web Title:  Modi government announcing hollow: Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.