शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साडेतीन वर्षांत देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. देश रसातळाला जात आहे. श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत आहेत, असा आरोप शुक्रवारी काँग्रेसतर्फे करण्यात आला.अॅड. कपिल सिब्बल यांनी आकडेवारी मांडून सांगितले की, पेटीएम, एअरटेल पेमेंट बँक यांच्यासारख्या डिजिटल बँकांना मोठा लाभ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होऊनही ग्राहकांना महाग पेट्रोल- डिझेल दिले जात आहे. बँकांचा क्रेडिट ग्रोथ भारताच्या इतिहासातील सर्वांत खालच्या स्तरावर पोहोचला आहे. आरबीआयचे आकडे सांगतात की, वर्ष १६-१७मध्ये ग्रोथ ५.७ टक्क्यांपर्यंत खाली आला. तोटा वाढत आहे. उद्योग बंद होत आहेत. रोजगार मिळणे तर दूरच, पण जे नोकरीवर आहेत त्यांचा रोजगारही हिसकावून घेतला गेला आहे.
मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था गाळात, काँग्रेसचे गंभीर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 4:12 AM