नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील ८ वर्षांतील आपल्या कार्यकाळात युवक, शेतकरी, सुरक्षा दलांतील जवान, छोटे व्यापारी, अनुसूचित जाती, जमाती, मागास वर्ग, अल्पसंख्याक व अन्य सर्वांची फसवणूक केली, असा आरोप काँग्रेसने केला.
मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आठ वर्षे, आठ फसवणुकी, भाजप सरकार अपयशी, अशा शीर्षकाची एक पुस्तिका काँग्रेसने जारी केली. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला व सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, अच्छे दिन येतील, अशा घोषणा झाल्या; परंतु मोदी आले तर महागाईच आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाहीच; उलट त्यांचे दु:ख १०० पटींनी वाढले. मोदी मंदीचे दिवस घेऊन आले. आता अच्छे दिनांचा फ्लॉप चित्रपट उतरला आहे. तर, सूरजेवाला म्हणाले की, सरकार आपल्या अपयशावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आता कपट व खाेटेपणाचा आश्रय घेत आहे.
असे आहेत आरोपnकाँग्रेसच्या पुस्तिकेत तपशील, आकडेवारीसह सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल, डिझेल व अनेक खाद्यवस्तूंच्या किमतींमध्ये झालेल्या भरमसाट वाढीचा उल्लेख त्यात आहे. भाजप आहे, तर महागाई आहे.nमोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था जमिनीवर आली. एका डॉलरची किंमत ७७.८१ रुपये झाली. या सरकारच्या काळात कर्ज वाढून १३५ लाख कोटी झाले.nशेतकऱ्यांची घोर फसवणूक करण्यात आली. २०१४मध्ये शेतकऱ्यांवर एकूण ९.६४ लाख कोटींचे कर्ज होते. ते आता १६.८० लाख कोटी झाले.nधार्मिक वाद निर्माण करून अल्पसंख्याकांना निशाणा बनविले. आता केवळ मुस्लीम अल्पसंख्याकच नाही तर ख्रिश्चन, शीखही निशाण्यावर आहेत.nराष्ट्रीय सुरक्षेबाबतही फसवणूक केली. चीनने लडाखमध्ये, गोगरा हॉटस्प्रिंगमध्ये भारताची जमीन काबीज केली.