मोदी सरकार उद्योगपतींच्या बाजूचे - राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:22 AM2018-06-07T02:22:17+5:302018-06-07T02:22:17+5:30
मध्य प्रदेशात आम्ही सत्तेवर आलो, तर १0 दिवसांत शेतक-यांची कर्जे माफ करू, त्यासाठी ११ वा दिवसही उजाडणार नाही, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी शेतक-यांच्या मेळाव्यात दिले.
मंदसौर : मध्य प्रदेशात आम्ही सत्तेवर आलो, तर १0 दिवसांत शेतक-यांची कर्जे माफ करू, त्यासाठी ११ वा दिवसही उजाडणार नाही, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी शेतक-यांच्या मेळाव्यात दिले. मोदी सरकार उद्योगपतींच्या बाजूचे असल्याची टीका राहुल यांनी केली.
मंदसौरच्या पिपलिया मंडी येथे हा मेळावा झाला. येथे गेल्या वर्षी ६ जूनला आंदोलन करणाºया ६ शेतकºयांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ झालेल्या मेळाव्यात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ तसेच ज्योतिरादित्य सिंदिया हेही यावेळी उपस्थित होते.
आमची सरकारे असलेल्या कर्नाटक व पंजाबमध्ये आम्ही लगेचच शेतकºयांची कर्जे माफ केल्याचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन २0१४ साली दिले होते. पण देशातील जनतेला त्यातील एकही पैसा आजतागायत मिळालेला नाही. (वृत्तसंस्था)
कुटुंबीयांची घेतली भेट
मृत शेतकºयांचे नातेवाईकही तिथे येणार होते. पण सरकारी अधिकाºयांनी आपणास तिथे जाऊ दिले नाही, असे या नातेवाईकांनी सांगितले.
काही मृत शेतकºयांचे नातेवाईक सरकारी नोकरीत आहेत. तु्म्ही राहुल गांधी यांना भेटायला गेल्यास, तुमच्या नोकºया धोक्यात येतील, असे अधिकाºयांनी आम्हाला सांगितल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मात्र राहुल गांधी यांनी मृत शेतकºयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
अडीच लाख कोटींची कर्जे माफ
मोदी सरकारने आतापर्यंत १५ उद्योगपतींची अडीच लाख कोटींची कर्जे लगेच माफ केली. मात्र शेतकºयांची कर्जे माफ करावीत, शेतमालाला चांगला भाव द्यावा, असे सरकारला वाटत नाही, अशी टीका करून राहुल गांधी यांनी यूपीए सरकारच्या काळात शेतकºयांसाठी देण्यात आलेल्या ७0 हजार कोटींच्या पॅकेजचा आवर्जून उल्लेख केला. मोदी सरकारला शेतकºयांचे प्रश्न सोडवण्याची अजिबात इच्छाच नाही, असा आरोप करून, त्यामुळेच शेतकºयांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, असे नमूद केले