शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

मोदी सरकार अखेर नमले!

By admin | Published: May 13, 2015 2:10 AM

गुंतवणूकदार व उद्योजकांपुढे पायघड्या घालण्यासाठी आपला आर्थिक सुधारणांचा अजेंडा पुढे दामटू पाहणाऱ्या मोदी सरकारला अखेर आक्रमक विरोधी पक्षांसह मित्रपक्षांच्या

नवी दिल्ली : गुंतवणूकदार व उद्योजकांपुढे पायघड्या घालण्यासाठी आपला आर्थिक सुधारणांचा अजेंडा पुढे दामटू पाहणाऱ्या मोदी सरकारला अखेर आक्रमक विरोधी पक्षांसह मित्रपक्षांच्या विरोधापुढे झुकावे लागले. वादग्रस्त भूसंपादन विधेयक आणि वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करण्यासाठीचे घटनादुरुस्ती विधेयक अशी दोन्ही विधेयके व्यापक सहमतीशिवाय मंजूर होऊ शकत नाहीत याची जाणीव झाल्याने अखेर नमते घेऊन सरकारला ही दोन्ही विधेयके संयुक्त समित्यांकडे पाठविण्यास राजी व्हावे लागले.लोकसभेत बहुमत असूनही आक्रमक काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांसह शिवसेना आणि अकाली दल या मित्रपक्षांनीही विरोधाची भूमिका घेतल्याने भूसंपादन विधेयक या सभागृहात दामटले तरी अल्पमत असलेल्या राज्यसभेत अडकून पडेल याची खात्री पटल्याने हे विधेयक लोकसभा व राज्यसभेच्या ३० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविले गेले. समितीला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.देशव्यापी एकच बाजारपेठ स्थापन करून एकसमान कर आकारणी करणाऱ्या ‘जीएसटी’ विधेयकाचे गेली १२ वर्षे भिजत पडलेले घोंगडे संसदेच्या या अधिवेशनात हातावेगळे करण्याचा सरकारचा इरादा होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)