नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडिओ आता प्रसारित केल्याबद्दल काँग्रेसने मोदी सरकार व भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.सर्जिकल स्ट्राइकच्या वीरगाथेचा वापर भाजपा मतांसाठी करीत असून हा प्रकार निंदनीय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अडचणीत येतात, तेव्हा ते राजकीय फायद्यासाठी सैन्याच्या शौर्याचा वापर करतात, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ आता प्रसारित करण्याचे कारणच नव्हते, भारतीय जवानांविषयी काँग्रेसला कायमच आदर आहे आणि त्यांच्या शौर्याचा अभिमान काँग्रेसलाच नव्हे, तर संपूर्ण देशाला आहे. मात्र त्याचा असा राजकीय फायदा उठविण्यासाठी वापर करणे सत्ताधाऱ्यांसाठी लाजिरवाणे आहे, असे सुरजेवाला म्हणाले.सरकार अडचणीत असल्याने सत्ताधाºयांची खेळीमोदी सरकारने संरक्षण खात्याचे बजेट कमी केले, पुरेशी शस्त्रखरेदी केली नाहीत, वन रँक-वन पेन्शन पूर्णत: लागू केले नाही, मात्र याच सैन्याच्या शौर्याचा मोदी सरकार दोन वर्षांनंतर राजकीय फायदा उठवू पाहते, याचे कारणच मोदी सरकार व भाजपा सध्या अडचणीत आहेत. जनता त्यांच्यावर नाराजच नव्हे, तर संतप्त आहे, असे रणदीप सुरजेवाला म्हणाले.
मोदी सरकारने सैन्यासाठी काहीच नाही केले - काँग्रेसची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 6:47 AM