बंगळुरू : हवाईदलासाठी ‘राफेल’ लढाऊ विमानांचे उत्पादन करणे हा ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि.’ (एचएएल) कंपनीचा हक्क आहे. या कंपनीने आत्तापर्यंत देशाच्या संरक्षण दलांसाठी बजावलेली चोख भूमिका पाहता देशाचे ते या कंपनीला लागू असलेले देणे आहे. परंतु हे काम हिरावून घेऊन सरकारने राष्ट्रीय कंपनीचा अपमान केला, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली.
राफेल विमानांच्या सौद्यावरून सध्या सुरु असलेल्या राजकीय रणकंदनाला नवे वळण देत राहुल गांधी यांनी या कंपनीच्या आजी-माजी कर्मचाºयांशीच थेट संवाद साधला.कर्मचाºयांना उद्देशून ते म्हणाले की, सरकारकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीने तुमचे मन दुखावले हे मी जाणतो. सरकार काही तुमची माफी मागणार नाही. पण माझा काही संबंध नसला तरी मी तुमची माफी मागतो. मी इथे तुमच्या भावना जाणून घेण्यासाठी आलो आहे, जेणेकरून सत्तेवर आल्यावर आम्हाला त्याचे परिमार्जन करता येईल.
ते म्हणाले की, ‘एचएएल’ भारताची ‘सामरिक संपत्ती’ आहे. स्वातंत्र्यानंतर अशा अनेक सामरिक संपत्तींची उभारणी करण्यात आली. परंतु आता त्या पद्धतशीरपणे मोडीत काढल्या जात आहेत.
राहुल गांधी पत्रकारांना म्हणाले की, ‘एचएएल’ला विमान उत्पादनाचा ७० वर्षांचा अनुभव असूनही त्यांना अनुभव नाही, असे संरक्षणमंत्री म्हणतात. पण राफेलचे काम ज्यांना दिले, त्या अनिल अंबानींना यांचा अनुभव १२ दिवसांचा आहे. ‘एचएएल’वर कर्ज नाही. अंबानींच्या डोक्यावर ४५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे.
भाजपाचा पलटवारराहुल गांधी यांच्या आरोपांवर पलटवार करताना भाजपा मंत्र्याने सांगितले की, आमचे सरकार आल्यापासून ‘एचएएल’ला दरवर्षी २२ हजार कोटी रुपयांची कामे दिली जात आहेत. आधीच्या ‘संपुआ’च्या काळात वर्षाला १० हजार कोटी रुपयांची कामे दिली जात. शिवाय ‘राफेल’चे काम ‘एचएएल’लाच मिळावे यासाठी आग्रही असणाऱया काँग्रेसने स्वत:च्या सत्ताकाळात हा करार सात वर्षे का रखडत ठेवला? (वृत्तसंस्था)