शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

देशवासियांना आजच कोरोना लस मिळण्याची शक्यता; केंद्रात मोठी बैठक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 3:34 PM

Corona Vaccine: सरकारने देशात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरणासाठी तयारीला सुरूवात केली आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लस देण्याआधी घेण्यात आलेले ड्राय रन यशस्वी झाले आहे. देशवासियांसाठी थोड्याच वेळात एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कोरोनाशापित वर्ष संपून नववर्षाच्या स्वागताला तयार असलेल्या देशवासियांसाठी थोड्याच वेळात एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोरोना लसीवर मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारतात आजच कोविशिल्ड लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. सुरुवातीला य़ा लसीला इमरजन्सी परवानगी मिळू शकते. 

आज या कोरोना लसीच्या मंजुरीशी संबंधित तज्ज्ञांच्या समितीची (SEC) बैठक होत आहे. या बैठकीत भारतात कोरोना लसीला परवानगी देण्य़ावर निर्णय होणार आहे. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे. ब्रिटनमधील नियामक संस्था मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं (एमएचआरए) ऑक्सफर्ड (Oxford) ऍस्ट्रा झेनेकाच्या (Astra Zeneca) लसीच्या वापरास परवानगी दिली आहे. भारतात ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीची चाचणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. ब्रिटनच्या नियामक यंत्रणेकडून ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर भारतात या लसीच्या वापरास मंजुरी देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू आहे. 

सीरमवर जबाबदारी सीरम इन्सिट्यूट ऑक्सफर्डची लस बनवत आहे. या कंपीनुसार कोविशिल्डचे 4 ते 5 कोटी डोस बनविण्यात आले आहेत. तसेच 2021 च्या शेवटी 30 कोटी डोस बनविण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस टोचली जाणार आहे. यामध्ये कोरोना वॉरिअर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, 50 हून अधिक वय असलेले लोक आणि आजारी लोकांना देण्याचा विचार आहे.

कोरोना लसीसाठी 'या' अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागणारकोरोना व्हायरसची लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. केंद्राची तातडीने, आपत्कालीन परवानगी मिळविण्यासाठी तीन कंपन्यांनी अर्ज केले आहेत. ब्रिटन, अमेरिका, बहारीन, रशियामध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामुळे भारतातही लवकरच लसीकरणाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. आता ही लस कशी दिली जाणार, कोण कोण लाभार्थी ठरणार, टप्पे, वितरण आदी प्लॅनिंग सुरु असताना अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. अशावेळी सरकारने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित केले आहे, जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे. 

या अ‍ॅपचे नाव आहे Co-WIN. हे Co-WIN App मोफत डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, सध्या हे अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध नाहीय. यामुळे डाऊनलोड करता येणार नाहीय. अशाप्रकारचे अ‍ॅप कुठेही आढळल्यास ते डाऊनलोड करू नका. ते फेक असू शकते शिवाय तुमचा डेटा हॅकर्सना मिळू शकतो. केंद्र सरकार या अ‍ॅपच्या लाँचची अधिकृत घोषणा करणार आहे. या अ‍ॅपबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. 

को-विन अ‍ॅपमध्ये लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसेच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे. ग्राम पंचायत सरपंच देखील त्याच्या गावातील लोकांच्या लसीकरणासाठी या अ‍ॅपद्वारे अर्ज करू शकणार आहे. 

CoronaVirus: मोठी बातमी! कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' सक्सेसफुल; केंद्रासमोरचे मार्ग मोकळेसरकारने देशात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरणासाठी तयारीला सुरूवात केली आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लस देण्याआधी घेण्यात आलेले ड्राय रन यशस्वी झाले आहे. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ही मॉक ड्रिलसाऱखी चाचणी घेण्यात आली होती. चाचणी म्हणून कोरोना लसीकरण सुरू करण्यासाठी येथे निर्धारित पद्धती तपासल्या गेल्या. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांतील प्रत्येकी दोन जिल्ह्यांत लस ड्राय रन चाचण्या घेण्यात आल्या. कोरोना लस  ड्राय रनच्या मदतीने खऱ्या लसीकरणासाठी आवश्यक संपूर्ण तयारी केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार