शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; नोकरदारांना ग्रॅच्युईटीमध्ये दिलासा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 12:51 IST

ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्ये बदल झाल्यास एक वर्ष काम केल्यानंतर नोकरदार वर्ग कंपनीतून ग्रॅच्युईटीचा पैसा काढू शकणार आहेत. मोदी सरकार यावरही विचार करत आहे की, ठरविलेल्या काळासाठी काम करणाऱ्या लोकांनाही  ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्ये ठेवले जावे.

केंद्र सरकार नोकरदार वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यानुसार सरकार ग्रॅच्युईटीमध्ये (New rules of Gratuity)  मोठे बदल करणार आहे. सध्या पाच वर्षे सलग एकाच कंपनीत काम केल्यास कंपनी सोडतेवेळी ग्रॅच्युईटी दिली जाते. आता हा कालावधी एक वर्षावर आणण्याचा विचार सुरु आहे. 

ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्ये बदल झाल्यास एक वर्ष काम केल्यानंतर नोकरदार वर्ग कंपनीतून ग्रॅच्युईटीचा पैसा काढू शकणार आहेत. मोदी सरकार यावरही विचार करत आहे की, ठरविलेल्या काळासाठी काम करणाऱ्या लोकांनाही  ग्रॅच्युईटीच्या नियमंमध्ये ठेवले जावे. असे झाल्यास 11 किंवा 12 महिन्यांच्या कंत्राटावर असलेले कर्मचारीही या नव्या नियमांनुसार ग्रॅच्युईटीचे लाभार्थी असणार आहेत. मात्र, अद्याप याबाबत काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाहीय. कारण याबाबतचे नियम कधी बनविण्यात येतील आमि कधी याची घोषणा केली जाईल याची कल्पना देण्यात आलेली नाहीय. हे नियम झाल्यास याचा करोडे नोकरवर्गाला फायदा होणार आहे. 

सरकारचा प्रयत्न आहे की, ग्रॅच्युईटीलाही पीएफ फंडासारखे बनविले जावे. म्हणजेच नोकरी बदलल्यास दुसऱ्या कंपनीच्या खात्यामध्ये ही ग्रॅच्युईटी वळती करता येईल. जसे की आता पीएफमध्ये केले जाते. यामुळे संपूर्ण ग्रॅच्युईटीच्या स्ट्रक्चरमध्येच बदल केला जाण्याची शक्यता आहे. ज्य़ा प्रमाणे पीएफच्या खात्यामध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम टाकली जाते, त्याचप्रमाणे ग्रॅच्युईटीमधेही सोय करण्यात येणार आहे. यासाठी योजना बनविण्यात येत आहे. तसेच ग्रॅच्युईटीला अधिकृतरित्या सीटीसीमध्ये टाकण्यासाठीही प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. यावर कामगार मंत्रालय काम करत आहे. तसेच कर्मचारी संघटनांशी यावर चर्चा केली जात आहे. 

ग्रॅच्युईटी म्हणजे काय? एकाच कंपनीमध्ये सलग काही वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगार, पेन्शन आणि पीएफशिवाय वेगळा ग्रॅच्युईटी फंड दिला जातो. याचा छोटा हिस्सा कर्मचाऱ्याच्या पगारातून कापला जातो, मात्र मोठा हिस्सा ही कंपनी देते. सध्याच्या नियमांनुसार कर्मचाऱ्याला कमीतकमी 5 वर्षे काम करणे आवश्यक आहे. तसेच कमीतकमी 10 कर्मचारी असलेल्या कंपनीला तिच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी देणे बंधनकारक आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते

सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'

बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद

बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले

Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारीProvident Fundभविष्य निर्वाह निधी