शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर मोदी सरकारने घातल्या धाडी -राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 04:57 AM2021-03-05T04:57:55+5:302021-03-05T04:58:05+5:30
अनुराग कश्यप, तापसी पन्नूवरील कारवाईचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या लोकांवर मोदी सरकार धाडी टाकत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
फँटम फिल्म्स या चित्रपट निर्मिती संस्थेने केलेल्या कथित करचोरीप्रकरणी प्राप्तिकर खात्याने अनुराग कश्यप, तापसी पन्नू आदींच्या मुंबई, पुण्यातील घरे व कार्यालयांवर ३० ठिकाणी बुधवारी धाडी घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, मोदी प्राप्तिकर खात्याला आपल्या इशाऱ्यांवर नाचवत आहेत. प्रसारमाध्यमांवरही मोदी सरकारचा मोठा दबाव आहे. नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर केंद्र सरकार धाडी घालत आहे.
भाजपनेही हिंदी म्हणींद्वारे दिले प्रत्युत्तर
n राहुल गांधी यांनी सांगितले की, मोदी सरकार ज्या पद्धतीने वागत आहे, त्यावरून ‘उंगलियों पे नचा’, ‘भीगी बिल्ली बनना’, ‘खिसियानी बिल्ली खंभा नोचे’ अशा हिंदीतल्या म्हणी व वाक्प्रचार आठवतात.
n त्यावर दिलेल्या प्रत्युत्तरात भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे की, आता विचारस्वातंत्र्याची कड घेणाऱ्या काँग्रेसने आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी केली होती. त्यामुळे या पक्षाचा पवित्रा ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को’ असा आहे.
n सध्या काँग्रेसची इतकी दुर्दशा झाली आहे की, तिची अवस्था ‘उंगलियोंपर गिने जा सकना’ अशी आहे.