मुंबई: देशातील कोरोना बाधितांचा आकडा ५३ लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या दररोज जवळपास ९० हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद देशात होत आहे. कोरोना बाधितांच्या बाबतीत भारत सध्या जगात दुसऱ्या स्थानी आहे. दैनंदिन व्यवहार जवळपास सुरळीत होत असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नोटांच्या माध्यमातून कोरोना पसरतो का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र मोदी सरकारनं याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.मोदी सरकारचं टेन्शन वाढलं; एकूण कर्जाचा आकडा पाहून बसेल धक्काकॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं ८ मार्च २०२० रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक पत्र लिहिलं होतं. नोटांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा फैलाव होतो का, अशी विचारणा पत्रातून करण्यात आली होती. कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं १५ मार्च २०२० रोजी असंच एक पत्र इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) संचालक डॉ. बलराम भार्गव यांना पाठवलं. मात्र या दोन्ही पत्रांना अद्याप तरी उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅनकोरोनाचा विषाणू नोटांच्या माध्यमातून पसरतो का, असा प्रश्न व्यापाऱ्यांसोबतच सर्वसामान्यांनादेखील पडला आहे. त्यामुळेच कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं याबद्दल आरोग्य मंत्री आणि आयसीएमआरला पत्र पाठवलं होतं. मात्र देशातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नाला अद्याप केंद्र सरकार आणि आयसीएमआरनं उत्तर दिलेलं नाही. विशेष म्हणजे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं अनेकदा या प्रश्नाची आठवण केंद्र सरकार आणि आयसीएमआरला करून दिली. मात्र तरीही उत्तर मिळालेलं नाही.दिलासादायक! कोरोना संकटात सर्व भारतीयांना सुखावणारी आकडेवारी; अमेरिकेला टाकलं मागेसंशोधन काय सांगतं?देशासह परदेशात करण्यात आलेल्या विविध संशोधनांमधून नोटांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव अतिशय वेगानं होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. नोटांचा पृष्ठभाग कोरडा असतो. त्यामुळे यावर कोणत्याही प्रकारचे जिवाणू बऱ्याच कालावधीपर्यंत जिवंत राहतात. बरेचसे आर्थिक व्यवहार अज्ञात व्यक्तींमध्ये होतात. त्यामुळे कोणत्या व्यक्तीला कोणता आजार आहे, याबद्दल कोणतीही माहिती नसते. याच कारणामुळे नोटांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
CoronaVirus News: नोटांमुळे कोरोना पसरतो का? मोदी सरकारचं मौन; ६ महिने पत्राला उत्तर नाही
By कुणाल गवाणकर | Published: September 19, 2020 10:36 PM