नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन पाळण्याच्या दिशेने पहिले धडक पाऊल टाकताना काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक काश्मिरी पंडिताच्या कुटुंबाला घरांची पुन्हा उभारणी करण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे.गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. काश्मिरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात परतण्याला प्रोत्साहन देण्यासह त्यांच्या पुनर्वसनासाठी मोदींनी पंतप्रधान पॅकेजमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारकडून त्याबाबत प्रस्ताव मिळाला होता. लवकरच या पॅकेजच्या औपचारिक मंजुरीसह अंमलबजावणी केली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
मोदी सरकार लागले कामाला
By admin | Published: June 14, 2014 3:23 AM