शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

मोदी सरकारकडून मुस्लिमांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे; खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 2:29 PM

भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत आता आसामधील खासदार बदरुद्दीन अजमल यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा सरकारच्या काळात मुस्लिमांसोबत मानवतेने वागवले जात नाही आहे. त्यांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. मुस्लिमांना भारतीय नागरिक मानले जात नाही आहे, असा आरोप बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे.बदरुद्दीन अजमल हे आसाममधील खासदार असून, ते एआययूडीएचे प्रमुख आहेत. सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनावर अजमल यांनी गंभीर टीका केली आहे. मुस्लिम समाजाला देण्यात येत असलेल्या दुजाभावाबद्दल ते म्हणाले की, ''तुम्ही उत्तर प्रदेशसह देशातील अन्य भागात सीएए विरोधात झालेल्य आंदोलनाच्या घटना पाहा. पोलिसांना आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला जातो. मात्र नंतर त्यांची कसलीही चौकशी होत नाही. उलट त्यांचे कौतुकच केले जाते. असे कौतुक करतानाचे भाजपा नेत्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.जे अत्यंत लाजिरवाणे आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. भाजपाने देश चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्यातरी देश त्यांच्या ताब्यात आहे. मात्र उद्या देशाची सूत्रे अन्य कुणाच्या तरी ताब्यात असतील.''''भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे हे धोरण फार काळ चालेल, असे मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरूनही त्यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. ''केंद्रातील भाजपा आणि मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज ऐकून घेऊ इच्छित नाही. आपल्याकडे बहुमत आहे त्यामुळे आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. मात्र हा केवळ भ्रम आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवू आणि नागरिकत्व कायदा लागू करून लोकांनी घुसखोर ठरवू, असे त्यांना वाटते. मात्र हे सर्व काही फार काळ चालणार नाही, असा टोलाही अजमल यांनी लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस त्यांनीच विणलेल्या जाळ्यात फसतील, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAssamआसामcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारण