मोहाली (पंजाब) : नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना ‘लोढणे’ समजते, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर सोमवारी येथे टीका केली. त्यांनी बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, देशातील प्रत्येक संस्थेवर हल्ला केला जात आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने (एजेएल) ‘नवजीवन’ या हिंदी वृत्तपत्राला पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा गांधी बोलत होते. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची देणी हे मुख्य मुद्दे असून, देशात संताप वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकार युवकांना रोजगार देऊ शकत नाही आणि मोदी सरकारसमोर हेच मुख्य आव्हान आहे, असे गांधी म्हणाले.पंजाबच्या भूमीवरून बोलताना मला हे म्हणायचे आहे की, २१ असेल वा २२ वे शतक हा देश शेतकºयांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, हे १०० टक्के स्पष्ट आहे.नक्कीच पराभूत करूकाँग्रेस संस्थांना सुरक्षित राखण्यासाठी लढत आहे आणि आम्ही त्यात जिंकू. आम्ही भाजपाला निवडणुकीत पराभूत करू आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ; परंतु आम्हाला पुढे जायचे आहे. रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यावेळी उपस्थित होते.
मोदी सरकार शेतकऱ्यांना लोढणे समजते : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 6:07 AM