नवी दिल्ली : मोदी सरकारने 59 चिनी अॅप्स कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सरकारने या चिनी अॅप्स कंपन्यांना बंदीचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मोदी सरकारने 29 जूनला देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व आणि एकात्मतेसाठी धोका दर्शविणार्या टिकटॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चिनी मोबाइल अॅप्सवर बंदी घातली आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सर्व चिनी अॅप्स कंपन्यांना पत्र लिहून या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की, या चिनी अॅप्सवर सार्वभौमत्व आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत बंदी घातली गेली आहे.
बंदी घातलेल्या चिनी अॅप्सचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामकाज केवळ बेकायदेशीरच नाही तर माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर कायद्यांतर्गत गुन्हाही आहे. बंदी असूनही ही चिनी अॅप्स भारतात कोणत्याही प्रकारे वापरण्यासाठी उपलब्ध करुन दिली गेली तर ती कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल. त्यामुळे या प्रकरणात दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही सरकारने म्हटले आहे. सुत्रांनी सांगितले की, या चिनी अॅप्स कंपन्यांना सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, भारत आणि चीन सैन्यात गलवान खोऱ्यात संघर्ष होण्याच्या आधीपासून म्हणजे देशात कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यापासूनच चिनी वस्तूंप्रमाणे चिनी मोबाईल आणि अॅप्सवरही बहिष्कार घालण्यासंदर्भात समाजमाध्यमांवरून मोहीम चालवली जात होती. ही चिनी अॅप्स वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या. विशेषत: टिकटॉक या लोकप्रिय अॅपवरून प्रसारीत केल्या जाणाऱ्या चित्रफिती आणि संवाद यांच्याविषयी अनेकदा वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
आणखी बातम्या...
आता चीनच्या अडचणी वाढणार, मोदी सरकार नवीन नियम लागू करणार
बाटलीबंद पाण्याला २० रुपये अन् दुधाला १७ रुपये दर, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे - राजू शेट्टी
Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...