शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

मोदी सरकारच्या 'या' जबरदस्त प्लानमधून २० लाख तरुणांना रोजगार मिळणार; ४००० कोटींहून अधिक खर्च होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 9:46 PM

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान मित्र योजनेअंतर्गत ४,४४५ कोटी रुपये खर्चून मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली-

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान मित्र योजनेअंतर्गत ४,४४५ कोटी रुपये खर्चून मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या मेगा पार्क्समधून देशभरात २० लाखाहून अधिक तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार प्राप्त होणार आहे. हे टेस्कटाईल पार्क तामीळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये होणार आहेत. 

केंद्रीय मंत्र्यांनी एका कार्यक्रमात दिलेल्या माहितीत मेगा टेक्सटाइल पार्क्समध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुमारे ७०,००० कोटी रुपयांची देशी आणि विदेशी गुंतवणूक अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सात राज्यांमध्ये प्रधानमंत्री मित्र मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणा केली होती.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने ऑक्टोबर २०२१ मध्ये पीएम मित्र योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आहे. तिचे पूर्ण नाव प्रधानमंत्री मेगा टेक्सटाईल इंटिग्रेटेड टेक्सटाईल आणि परिधान योजना असे आहे. या योजनेंतर्गत सात नवीन टेक्सटाईल पार्क बांधण्यात येणार आहेत. सरकारच्या मते, यामुळे वस्त्रोद्योग आणि उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. या घोषणेमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे, असं गोयल म्हणाले. 

उत्पादन आणि निर्यातीवर भर दिला जाणारपीयूष गोयल यांच्या दाव्यानुसार हे पाऊल पीएम मोदींच्या 5F व्हिजनपासून प्रेरित आहे. या 5F व्हिजनमध्ये फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेनचा समावेश आहे. त्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. या योजनेमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात २१ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामध्ये ७ लाख प्रत्यक्ष आणि १४ लाख अप्रत्यक्ष योजनांचा समावेश आहे. या योजनेमुळे उत्पादन आणि निर्यात-केंद्रित वाढ होईल. पीएम मित्र योजनेंतर्गत कताई, विणकाम, प्रक्रिया, डाईंग आणि छपाईपासून कपड्यांच्या निर्मितीपर्यंतचे काम एकाच ठिकाणी केले जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpiyush goyalपीयुष गोयल