नवी दिल्ली: छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Scheme) गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारनं झटका दिला आहे. छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२१ म्हणजेच उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होईल.मोठा 'आधार'! पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यास मुदतवाढ; लाखो नागरिकांना दिलासापीपीएफवरील व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपातपब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (Public Provident Fund) गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं धक्का दिला आहे. व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. आतापर्यंत पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के होता. आता ते ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील (National Savings Certificate) व्याजदरातही ९० बेसिस पॉईंटची कपात कपात करण्यात आली. आधी गुंतवणुकीवर ६.८ टक्के व्याज मिळायचं. यापुढे ५.९ टक्के व्याज मिळेल.
मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका; नुकसान भरून काढण्यासाठी थेट बचतीवर हात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 10:38 PM