नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारने मंगळवारी 100 दिवस पूर्ण केले. काँग्रेसने यानिमित्ताने सरकारला जोरदार टीकेचा अहेर दिला आहे. रालोआ सरकारचा 1क्क् दिवसांचा कार्यकाळ पूर्णत: निराशाजनक आणि भ्रमनिरास करणारा असल्याचा मुद्दा काँग्रेसने अधोरेखित केला आहे.
लोकसभा निवडणुकीआधी मोदींनी खोटी स्वप्ने विकली़ ही स्वप्ने कधीच साकार होण्याची शक्यता नाही़ महागाई कमी करू, युवांना रोजगार देऊ, महिलांविरुद्धचे अत्याचार संपवू, सुशासन आणू, अशी एक ना भाराभार आश्वासने दिली़ मोदींनी आश्वासन दिले नाही,
असा एकही मुद्दा नाही़ पण मोदी
सरकारची 1क्क् दिवसांची कथा निराशाजनकच ठरली़ देशात महागाई वाढली, डिङोलचे भाव वाढले,
दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव आभाळाला टेकले, असे काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाल़े
काँग्रेस नेता अंबिका सोनी यांनी सरकारवर फुटीचे राजकारण करण्याचा आरोप केला़ रालोआ सरकार महागाई, भ्रष्टाचार आणि कायदा-व्यवस्था या तीन मुद्दय़ांवर सपशेल अपयशी ठरल्याचे त्या म्हणाल्या़ संपुआ सरकार सत्तेवर असताना भाजपाने भ्रष्टाचार आणि महागाई हे दोन मुद्दे लावून धरले होत़े मात्र आज
रालोआ सरकारला 1क्क् दिवस पूर्ण झालेत; पण या 1क्क् दिवसांत ना महागाई कमी झाली, ना भ्रष्टाचाराविरुद्ध ठोस पावले उचलली गेलीत, अशी टीका त्यांनी केली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
काळ्या पैशाचा मुद्दा कळीचा
1क्क् दिवसांत काळा पैसा देशात परत आणू, असे आश्वासन सरकारने दिले होत़े हा पैसा 85 लाख कोटींच्या घरात आह़े आज सरकारला 1क्क् दिवस पूर्ण झालेत, पण अद्याप यापैकी 85 पैसेही देशात परत आले नाहीत़ ही जनतेची फसवणूक आहे, अशी टीका काँग्रेसने केली़
काँग्रेस नेत्यांची निदर्शने : निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ मार्च काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेत्यांना पोलिसांनी लखनौत ताब्यात घेतल़े प्रदेश काँग्रेस अध्यक्ष निर्मल खत्री यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकत्र्यानी विधानसभेकडे कूच केली होती.