नवी दिल्ली : कोरोना काळात मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. किसान क्रेडिट कार्ड असे की शेतकऱ्यांना 2000 रुपयांची मदत याद्वारे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. स्वस्त व्याजदरावर शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये कर्ज उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज दिले जात आहे.
17 ऑगस्टपर्यंत मोदी सरकारने शेतकऱ्यांना तब्बल 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्ड वाटली आहेत. या क्रेडिट कार्डची एकूण लिमिट हे 1,02,065 कोटी रुपये आहे. मोदी सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजाने पैसे उपलब्ध होणार आहेत. तसेच ग्रामीण अर्थव्य़वस्थाही पुढे जाण्यासाठी हे फायद्याचे ठरणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत मोदी सरकारने शेतकऱ्यांना पुढील काळात 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज कमी व्याजदराने उपलब्ध करण्याची घोषणा केली होती.
मोद सरकारच्या य़ा घोषणेचा जवळपास 2.5 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये मच्छीपालन करणारे शेतकरी ते डेअरी उद्योग चालविणारे शेतकरी सहभागी आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. उद्योग क्षेत्रात वाढ करण्यासोबतच शेतकरी, व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात येत आहे.
किसान सन्मान योजना...PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हप्ते पाठविले जातात. अशाप्रकारे 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात. काही शेतकरी या योजनेत आहेत परंतू काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना हे पैसे मिळत नाहीत. असे लोक सरकारने दिलेल्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवू शकतात. शेतकरी पीएम किसान सम्मान निधि योजनेची (PM Kisan Samman Nidhi Yojana) हेल्पलाईन (PM-Kisan Helpline No. 155261) किंवा 1800115526 (Toll Free) किंवा 011-23381092 वर तक्रार करू शकता. यासह ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वरही तक्रार करता येते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर
मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अॅप लाँच
तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले
लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले
'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले
पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले
एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब