शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

मोदी सरकारच्या किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत, मग अशी करा तक्रार...

By महेश गलांडे | Published: December 25, 2020 8:59 PM

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. यानंतर मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ठळक मुद्देयापूर्वीच्या यादीत आपलं नाव आहे, परंतु अपडेटेड नवीन यादीत आपलं नाव नसेल तर तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबरवर तुमची तक्रार दाखल करु शकता. पीएम किसान हेल्पलाइन नंबर पुढील अंक आहेत - 011-24300606

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातले शेतकरी रस्त्यावर उतरले असताना, दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. स्वत:च्या राजकीय लाभासाठी विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. तर, 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपयेही ट्रान्सफर करण्यात आले आहेत. 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. यानंतर मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या मनोज नावाच्या शेतकऱ्यानं नव्या कृषी कायद्यांमुळे फायदा झाल्याचं सांगितलं. नव्या कायद्यांमुळे नवे पर्याय उपलब्ध झाले. आधी आमच्याकडे बाजारात जाऊन शेतमाल विकण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता आम्ही खासगी व्यापारी किंवा संस्थांना शेतमाल विकू शकतो. ते आमच्यासाठी फायदेशीर ठरतं, असं मनोज यांनी मोदींना सांगितलं.

मोदी सरकारच्या या योजनेचं भाजपाने मोठ्या इव्हेंटमध्ये रुपांतर केल्याचं दिसून आलं. देशभरातील विविध राज्यांत, जिल्ह्यात हा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आला. तसेच, भाजपा पदाधिकाऱ्यांनीही या योजनेतून शेतकऱ्यांचा लाभ होत असल्याचं सांगताना, केंद्र सरकारचे शेती कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचं पटवून दिलं. एका कार्यक्रमात दोन हेतू मोदी सरकारने साध्य केले आहेत. या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात आनंद दिसून आला. पण, ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांना यासंदर्भात तक्रार करुन किंवा माहिती घेऊन लाभ घेता येईल. त्यासाठी खाली दिलेली प्रकिया वाचून ती अवगत करावी लागेल.    

अशी करा तक्रार...

यापूर्वीच्या यादीत आपलं नाव आहे, परंतु अपडेटेड नवीन यादीत आपलं नाव नसेल तर तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबरवर तुमची तक्रार दाखल करु शकता. पीएम किसान हेल्पलाइन नंबर पुढील अंक आहेत - 011-24300606, याशिवाय केंद्र सरकारकडून आणखी काही नंबरही देण्यात आले आहेत. त्यामुळे, आपणास या योजनेतून पैसे मिळाले नसल्यासं तक्रार करता येईल. 

पीएम किसान टोल फ्री नंबर- 18001155266पीएम किसान हेल्पलाइन नंबर-155261पीएम किसान लैंडलाइन नंबर- 011-23381092, 23382401पीएम किसान हेल्पलाइन-  0120-6025109ई-मेल आईडी- pmkisan-ict@gov.in

योजनेतील लाभार्थ्यांची यादी येथे पाहावी -

सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक कराhttps://pmkisan.gov.in 

वेबसाईटच्या उजव्या बाजूस  'Farmers Corner' च्या खाली तुम्हाला 'Beneficiary List' चा पर्याय दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज खुले होईल, त्यावर राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, तालुका आणि गावं निश्चित करता येईल.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाonlineऑनलाइन