न्यूयॉर्क : मुख्य सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत मोदी सरकारची गती संथ आहे, असे मत अमेरिकेचे वाणिज्य, आंतरराष्ट्रीय व्यापार, प्रशासन विभागाचे सहमंत्री अरुण कुमार यांनी व्यक्त केले आहे. जीएसटी आणि भूमी अधिग्रहण विधेयकावर मोदी सरकारने तेवढी तत्परता दाखविली नाही, जेवढी अपेक्षित होती असेही ते म्हणाले; पण अमेरिकन कंपन्यांना धीर धरण्याचे आवाहन करतानाच सुधारणांची अंमलबजावणी रात्रीतून होत नाही, असेही ते म्हणाले. केपीएमजी, आशिया सोसायटी व अमेरिका भारत बिझनेस काऊंसिल यांच्याद्वारे भारत-अमेरिका संबंध व भारतीय अर्थसंकल्प या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (वृत्तसंस्था)