नवी दिल्लीः भारत-चीन सीमा वादावरून दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये भेट झाली आहे. त्यानंतरसंयुक्त निवेदनही काढण्यात आलं. त्यावरूनच आता एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर हल्ला केला आहे. तणावाबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे समकक्ष वांग यी यांच्यात गुरुवारी मॉस्को येथे चर्चा झाली. या चर्चेत तणाव कमी करण्यासाठी पाच-कलमी योजनेवर सहमती दर्शविली गेली आहे. ओवैसी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हणाले, मोदी सरकारने 1000 चौरस किलोमीटर जागेचा भारताचा हक्क समर्पित केला आहे का?, परराष्ट्रमंत्र्यांनी एप्रिलपूर्वीच्या स्थितीत चीनला येण्यास का नाही सांगितले?, असा सवालही ओवैसी यांनी विचारला आहे. ओवैसी ट्विटमध्ये लिहितात, "परराष्ट्र मंत्र्यांचे संयुक्त विधान आम्ही पाहिले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एप्रिलपूर्वी चीनला लडाखमधील LACच्या स्थितीवर येण्याबद्दल का विचारले नाही किंवा परराष्ट्रमंत्रीही आपले बॉस पीएमओ इंडियाशी सहमत आहेत की आमच्या भागात कोणताही चिनी सैनिक आला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सबसिडी
पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे
…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा
कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता