ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना ट्विटरद्वारे संदेश दिला आहे. भारतामध्ये 25 जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या तरुणांनी 18 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांनी आपले नाव मतदार यादीत सामाविष्ट करण्याचे अावाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना मतदार यादीत नाव सामाविष्ट करण्याचे आणि मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आग्रह केला आहे. 'निवडणुका या लोकशाहीला बळकटी देतात, लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. आपल्या इच्छेप्रमाणे उमेदवार निवडण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीने दिला आहे. यामध्ये आपल्याला योग्य उमेदवार निवडण्याचे स्वतंत्र आहे', असे यावेळी मोदींनी सांगितले.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मोदी यांनी उत्तर प्रदेशसह अन्य पाच राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुका लक्षात ठेऊन मतदात्यांना मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी आपले नाव निवडणूक यादीत समाविष्ट करावे, असेही ते म्हणाले आहेत.
I urge every eligible voter to exercise his or her franchise & call upon my young friends to register as voters when they turn 18.
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2017