नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी ‘मी’, ‘माझे’ आणि ‘माझ्यासाठी’ असे शब्दप्रयोग करीत परदेशात बेभान आत्मस्तुती चालवली आहे. भारतासारख्या महान देशाचे पंतप्रधान एखाद्या शोमनच्या थाटात परदेशात फक्त आत्मप्रौढी मिरवत आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांसारख्या दिवंगत व वाजपेयींसारख्या माजी पंतप्रधानांचे योगदानही ते नाकारीत आहेत, ही बाब साऱ्या देशवासीयांची मान शरमेने खाली जावी अशी आहे. परदेशात केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी आपल्या मातेविषयी खोटे भावनाप्रधान नाटक त्यांनी वठवले. त्यापेक्षा भारतात एका जबाबदार मुलाच्या कर्तव्याचे त्यांनी पालन केले असते, तर ते अधिक उचित ठरले असते, असा चौफेर हल्ला राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते व पक्षप्रवक्ते आनंद शर्मा यांनी सोमवारी विशेष वार्तालापात चढवला.फेसबुक सीईओ मार्क जुकरबर्ग यांच्याशी झालेल्या संवादात आपली आई धुणीभांडी करीत असे हा उल्लेख करताना पंतप्रधान भावनाप्रधान झाल्याची बरीच जाहिरात झाली. प्रत्यक्षात मोदींचे हे विधान खोटे आहे. या विधानांनी मोदी आपल्या आईलाही अपमानित करीत आहेत, याचा खेद वाटतो, असेही आनंद शर्मा यावेळी म्हणाले.
मोदी ‘नाटका’वरून काँग्रेस-भाजपात जुंपली
By admin | Published: September 29, 2015 2:45 AM