बंगळुरू - कर्नाटक राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या असून २२४ मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. १० मे रोजी याठिकाणी मतदान होणार आहे. तर निकाल १३ मे रोजी लागणार आहे. राज्यात मागील २० वर्षापासून काँग्रेस, भाजपा आणि जेडीएस यांच्यात तिरंगी सामना पाहायला मिळाला आहे. यंदाही या तिन्ही पक्षात मुख्य लढाई असणार आहे. त्यात जेडीएसनं इतक्या जागा जिंकण्याची तयारी केली आहे ज्यानं ते राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहतील.
राज्यात एंटी इन्कंबेंसी, आरक्षण, जातीय समीकरण, काँग्रेसची गॅरंटी स्कीम, केंद्र आणि राज्य सरकारची विकास योजना त्याशिवाय लोकांना टीव्ही, स्मार्ट फोन, ग्राइंडरसारख्या मोफत वस्तू यासारखे ६ मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्याने असणार आहेत. राज्यात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यासोबत येदियुरप्पा, सीएम बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सिद्धारमैया, डिके शिवकुमार, जेडीएस नेते एचडी देवेगौडा, एचडी कुमारस्वामी हे प्रमुख चेहरे आहेत.
कोणाला किती टक्के मते पडली?
भाजपा २०१३ - १९.९ टक्के२०१८ - ३६.२ टक्के२०१९ लोकसभा निवडणूक - ५१.७ टक्के
काँग्रेस २०१३ - ३६.६ टक्के२०१८ - ३८ टक्के२०१९ लोकसभा निवडणूक - ३२.१ टक्के
जेडीएस२०१३ - २०.२ टक्के२०१८ - १८.४ टक्के२०१९ लोकसभा निवडणूक - ९.७ टक्केविधानसभेत कोणाचं किती प्राबल्य?भाजपा - १०४काँग्रेस - ८० जेडीएस - ३७
कर्नाटकचा राजकीय इतिहासराज्यात मागील ४ दशकापासून कुठलेही सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले नाही. अशा परिस्थितीत भाजपासाठी कर्नाटकात सत्ता मिळवणे मोठं आव्हानात्मक असणार आहे.
बहुतांश ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला आशादायी चित्रएबीपी सी-व्होटरचे सर्वेक्षणभाजप ६८ ते ८० काँग्रेस ११५ ते १२७ जेडीएस २३ ते ३५ अन्य ० ते २बहुतांश ओपिनियन पोल्सनी कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज वर्तवला आहे.