नवी दिल्ली - हेडिंग वाचून थोडं चकित झाला ना? नरेंद्र मोदी यांनी स्वत:ची एक योजना पंतप्रधानपदी आल्यानंतर नाकारली आहे. गुजरात विधानसभेमध्ये भाजपाकडून काल ही माहिती देण्यात आली. 2012मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना साबरमती आश्रमाचा कायापालट करण्यासाठी प्रोजेक्ट तयार केला होता. या प्रोजेक्टमधून केंद्र सरकारला 287 कोटी रुपयांचा फायदा होणार होता. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी या प्लॅनची प्रत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवली होती.
2012 मध्ये यूपीए सरकारने या प्रोजेक्टकडे दुर्लक्ष केलं होते आणि त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नरेंद्र मोदी यांनीही या प्रोजेक्टला मंजूरी दिली नाही. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना मोदी यांनी स्वत:च हा प्रोजेक्ट केंद्राकडे पाठवला होता.
पुढच्या वर्षी महात्मा गांधी यांची 150 वी जयंती मोठ्या भव्यदिव्य पद्धतीने केला जाणार आहे. 2013 च्या अहवालानुसार गांधी आश्रमाच्या बाबतीत आणखी एक प्रोजेक्ट आहे जो आणखी पूर्ण झाला नसल्याची माहिती भाजपा मंत्री गणपत वसावा यांनी दिली. गेल्या दोन वर्षापासून गुजरात सरकार केंद्राकडे याचा पाठपुरावा करत आहे, मात्र सरकारकडून यावर कोणतेही उत्तर मिळत नाही.