हैदराबाद : आपण प्रामाणिक असल्याचे सांगत, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे, बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, दहशतवाद संपवून टाकण्याचे, पाकिस्तानला धडा शिकवण्याचे अशी अनेक आश्वासने नरेंद्र मोदी यांनी २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिली. पण त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांना प्रामाणिक म्हणणेही चुकीचे ठरेल, असा हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी चढवला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याविषयी ते म्हणाले की, असंख्या आश्वासने द्यायची आणि त्यापैकी कोणतेच पूर्ण करायचे नाही, हीच त्यांची कार्यपद्धती असल्याचे चार वर्षांत जनतेला लक्षात आले आहे.पंतप्रधानांना सामान्य जनतेला दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत, पण देशातील १५ बड्या उद्योगपतींचा फायदा करून दिला, मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांना पळून जायला मदत केली, अनिल अंबानी यांना मोठे कंत्राट मिळवून दिले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी व तेलगू देसमचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू दोन दिवस तेलंगणात एकत्र प्रचार करीत आहेत.तेलगू देसम आतापर्यंत कायमच काँग्रेसच्या विरोधात राहिला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्हा दोन्ही पक्षांची विचारसरणी समान आहे. शिवाय मोदी सरकार देशातील सर्व घटनात्मक संस्थांना संपवून टाकण्यास निघाली असल्याने तेलगू देसम व काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचा दावा चंद्राबाबू यांनी केला.
चंद्राबाबू नायडू यांनी खम्माम येथील प्रचारसभेत ईव्हीएमबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला मतदारांना दिला. या वेळी व्यासपीठावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेही होते. काँग्रेसनेही ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केल्या असून, मतपत्रिकांचा वापर करावा, अशी काँग्रैसची कायमची मागणी आहे. कोणत्याही यंत्रात छेडछाड शक्य असते. ईव्हीएम हेही यंत्रच आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान केल्यानंतर आपण ज्यांना मत दिले, ते त्यांनाच गेले आहे का, हे व्हीव्हीपॅटवर येणाºया चिठ्ठीत तपासून पाहावे. आक्षेपार्ह आढळल्यास मतदान अधिकाºयांना त्याची कल्पना द्यावी, असे चंद्राबाबू म्हणाले.
देशातील सर्वच स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचे काम मोदी सरकार करीत असून, सर्वच लोकशाहीवादी राजकीय पक्षांनी त्यांना बाजूला सारून एक नवा अध्याय रचावा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपाला वगळून आघाडी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे केसीआर सांगत असले तरी टीआरएस-एमआयएमची आघाडी कशाच्या आधारे झाली आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. टीआरएस व एमआयएमला मत म्हणजे त्याचा फायदा भाजपलाच होणार असल्याने ते भाजपला मत आहे, असेही चंद्राबाबू नायडू म्हणाले.लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त केली जात आहेच्मेहबूब नगरमधील सभेत राहुल गांधी यांनीही भाजपा व टीआरएसवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकार देशातील सर्व महत्त्वाच्या संस्था मोडीत काढीत असून, लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त केली जात आहे. ज्या यंत्रणेवर देशाची एकता टिकून आहे, तिलाच धक्का पोचवला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.च्टीआरएसला विकास करायचा असता, तर त्यांनी मोदी व भाजपाला पाठिंबा दिला नसता. जे लोक लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी मनाला वाटेल, ते करीत आहेत, त्यांना बाजूला सारून लोकशाहीवादी उमेदवारांना जनतेने साथ द्यावी, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.