शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मोदी-शहांच्या केमिस्ट्रीने आणली भाजपमध्ये जान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 7:14 AM

गुजरातपासून सुरू झालेला करिष्मा देशपातळीवरील राजकारणाला देऊन गेला नवे वळण

लोकमत न्यूज नेटवर्कअनेक जणांकडे चांगले गुण असतात पण त्यांचा समन्वय असलेलाच सर्वोत्कृष्ट नेता बनतो. कूटनीतीज्ज्ञ, युद्धनीतीकार, प्रभावी वक्ता असे विविध गुण असलेले नरेंद्र मोदी हे म्हणूनच वडनगर येथील चहावाला ते दुसऱ्यांदा पंतप्रधान असा प्रवास करू शकले.कुशल नेतानरेंद्र मोदी यांच्याकडे असलेली राजकीय परिपक्वता आणि चातुर्य हे त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच स्पष्टपणे दिसून आली होती. २०१४मध्ये भाजपने पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार ते थेट पंतरप्रधान पद अशी झेप घेतल्यानंतर दुसऱ्यांदा हेच मिळवून त्यांनी आपले कुशल नेतृत्व सिद्ध केले.कुटनितीज्ज्ञराजकीय नेत्याबरोबरच नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेली कूटनीतीही महत्वाची आहे. यामुळे त्यांच्या विरोधामध्ये असणाºयांनाही मोदी यांना साथ देणे भाग पडलेले दिसून आले.युद्धनीतीकारयुद्ध जिंकायचे तर त्यासाठी आधीपासून डावपेच आखायला हवेत, याची पूर्ण जाणीव मोदी यांना आहे. त्याची झलक त्यांच्या कामातून दिसून येते. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच प्रचाराचे मुद्दे , प्रचाराचे तंत्र आणि रचना यावर त्यांची टीम काम करीत असते. संपूर्ण देशामध्ये मोदी यांचे नाव एक ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित करणे, निवडणूक प्रचाराच्या यात्रांचे नियोजन अशा सर्व मुद्यांवर मोदी यांची युद्धनीती आपल्याला दिसून येते.प्रभावी प्रचारतंत्रमोदींकडे असलेले प्रभावी प्रचारतंत्र हे त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. देशभरामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. या कार्यकर्त्यांकडून त्यांना सर्व माहिती मिळत असते. या माहितीचे विश्लेषण करून मोदी यांचे प्रचारतंत्र तयार होते आणि त्यानुसार काम केले जाते.

कणखर स्वभावनरेंद्र मोदी यांच्या स्वभावामध्ये असलेल्या कणखरपणाचा प्रत्यय वारंवार येत असतो. ते भाषणात जे काही मांडतात त्यापासून कधीच माघार घेत नाहीत. त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमधूनही त्यांच्या स्वभावातील कणखरपणा दिसून आलेला आहे.

वक्ता दशसहस्त्रेशूप्रभावी वक्तृत्वाची लाभलेली देणगी हा नरेंद्र मोदी यांचा आणखी एक स्वभाव विशेष होय. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर अमोघ वक्तृत्वाची देणगी असलेला हा नेता आहे. त्यांच्या भाषणामधून इतिहासाचे दाखले, काही विधानांची उडविलेली खिल्ली यासह भविष्याचे चित्र दाखविणारी आश्वासने अशा विविध बाबींचा समावेश असलेला दिसून येतो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९