करीमनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी संसदेत विधेयक आणावे, असे आवाहन विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे.मोदी हे भाजपने अयोध्येत राममंदिर बांधण्याबाबत केलेला ठराव तसेच वचनाची पूर्तता करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. लवकरच ते संसदेत विधेयक आणण्याबाबत तयारी करतील, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. विहिंप स्वयंसेवकाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून गुजरातमध्ये सोमनाथ मंदिर बांधण्यात आले होते. मुस्लिमांची त्याला परवानगी होती. न्यायालयाचा निकाल, तत्कालीन सरकार तसेच सर्वसामान्यांच्या इच्छा असा योग त्यावेळी जुळून आला होता, असे ते म्हणाले होते. (वृत्तसंस्था)
राममंदिरासाठी मोदींनी विधेयक आणावे -विहिंप
By admin | Published: March 22, 2016 3:15 AM