कोलकाता : पोलिस आयुक्तांच्या घरावर दोन दिवसांपूर्वी धाड टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतरचा प. बंगालमधील हायव्होल्टेज ड्रामा आज सायंकाळी संपला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर धरणे आंदोलन थांबविले आहे. मात्र, पुढील आठवड्यात 13 आणि 14 फेब्रुवारीला दिल्लीत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा ममता यांनी दिला.
ममता बॅनर्जी यांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधातील कारवाईविरोधात रविवारी रात्री धरणे आंदोलन छेडले होते. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राजीव कुमार यांना सीबीआय अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. शिलाँगच्या सीबीआय कार्यालयामध्ये कुमार हजर राहणार आहेत.