शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

मोदी- थेरेसा चर्चाः गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणावर सहकार्य हवे

By admin | Published: July 08, 2017 7:10 PM

पंतप्रधान मोदी यांनी भारतातून आर्थिक घोटाळे करुन गेलेल्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी सहकार्य करावे अशी मागणी इंग्लडकडे केली.

ऑनलाइन लोकमत
 
हॅम्बर्ग, दि.8- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी जी 20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळेस पंतप्रधान मोदी यांनी भारतातून आर्थिक घोटाळे करुन गेलेल्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी सहकार्य करावे अशी मागणी इंग्लडकडे केली.
 
नेमक्या याच वेळेस इंग्लडमध्ये भारतातील विविध बॅंकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून पळालेल्या विजय माल्यावर वेस्टमिनिस्टर कोर्टात खटला चालू आहे. माल्याला सध्या 4 डिसेंबर पर्यंत सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.  विजय माल्याने 2016 साली मार्च महिन्यामध्ये हर्टफोर्डशायर येथे पलायन केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि थेरेसा मे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. या भेटीबद्दल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 1992 साली प्रत्यार्पण करार करण्यात आला होता. मात्र आजवर केवळ समीरभाई विनुभाई पटेल या एकमेव आरोपीचे प्रत्यार्पण झालेले आहे. 2002 साली गोध्रानंतर झालेल्या दंगलीत सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याला पुन्हा भारतात पाठवले.
 
नरेंद्र मोदी- डोनल्ड ट्रम्प भेट
 
जी 20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी स्वतः पुढे जाऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  ट्रम्प यांनी घेतलेल्या उत्स्फुर्त भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचेही समजते. नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ अरविंद पानगढिया यांनी या भेटीचे काही क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करुन ट्वीट केले आहे. त्यानंतर ही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
 
मोदी-जिनपिंग यांची भेट; भारताची केली प्रशंसा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची दहशतवादाविरोधात 10 सूत्रं
पोलंडच्या फर्स्ट लेडीने पहिलं मेलानियांना केलं शेकहॅण्ड
 
जी 20 परिषदेत दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरु होण्यापुर्वी या दोन्ही नेत्यांनी उत्स्फुर्त संवाद साधला असे पानगगढिया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चांसोबत विविध देशांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत त्याचप्रमाणे जर्मनीच्या चॅन्सलर अॅंजेला मर्केल आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांची त्यांनी भेट घेतली. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि अॅंजेला मर्केल यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चा करत असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते.