मोदींनी केले राहुल गांधींचे स्वागत! राष्ट्रपती भवनात तणाव झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 02:00 AM2018-01-28T02:00:45+5:302018-01-28T02:01:12+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या सोहळ्यात राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसवल्याने काँग्रेसचे नेते संतप्त झाले असले. पण संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुढे येऊ न राहुल गांधी यांचे स्वागत केले आणि त्यांची विचारपूसही केली.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या सोहळ्यात राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसवल्याने काँग्रेसचे नेते संतप्त झाले असले. पण संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुढे येऊ न राहुल गांधी यांचे स्वागत केले आणि त्यांची विचारपूसही केली.
राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसण्याची सोय केल्याने काँग्रेस नेते संतापले, पण राहुल गांधी यांनी कोणतीही तक्रार केली. आपणास जिथे जागा देण्यात दिली आहे, तिथे आपण जाऊ न बसणार, असे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे ते तिथेच बसले. मात्र, या निमित्ताने काँग्रेस व भाजपा यांच्यात अपेक्षेप्रमाणे शाब्दिक बाचाबाची झालीच.
प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुखाला अशी वागणूक दिल्याबद्दल काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली. भाजपातर्फे त्याला उत्तर देण्यात आले. भाजपा विरोधात असताना आमच्या नेत्यांना काँग्रेसतर्फे अशीच वागणूक देण्यात आली होती, असा टोला भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी लगावला. ते म्हणाले की, राजनाथ सिंह भाजपाचे अध्यक्ष असताना, त्यांनाही प्रजासत्ताक दिन समारंभात मागच्या रांगेतील जागाच देण्यात आली होती, हे काँग्रेसने विसरू नये.
दुसºया रांगेत राहुल गांधी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या समारंभात राहुल गांधी यांना दुसºया रांगेत स्थान देण्यात आले होते. राहुल गांधी समारंभाला पोहोचताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊ न त्यांचे स्वागत केले.
त्या दोघांमध्ये काही बोलणेही झाले.
या समारंभाला १0 राष्ट्रप्रमुखांबरोबारच केंद्री मंत्री, खासदार, राजकीय नेते, राजदूत असे सुमारे १२00 लोक उपस्थित होते. सुषमा स्वराज यांची अनुपस्थिती मात्र सर्वांनाच जाणवली. निर्मला सीतारामन प्रत्येकाची चौकशी करताना दिसत होत्या.
या वेळी प्रथमच या समारंभाला मोबाइल आणण्याची परवानगी देण्यात आली होती. अनेक जण या निमित्ताने पंतप्रधानांसमवेत सेल्फी घेताना दिसत होते.
तक्रार नव्हती केली
आम्ही त्या वेळी कोणतीही तक्रार केली नव्हती आणि राजनाथ सिंह कोणतीही तक्रार न करता दिलेल्या जागेवर बसले होते. लोकशाहीतील संकेतांची किमान काँग्रेसने तरी आम्हाला आठवण करून देऊ नये, असे सांगून नरसिंह राव म्हणाले की, देशात आता काँग्रेसची सत्ता नाही आणि तरीही आपणास सुपर व्हीव्हीआयपीप्रमाणे वागणूक मिळावी, असे गांधी यांना वाटत आहे. राजशिष्टाचारामध्ये त्यांच्यासाठी विशेष स्थान नाही, हे त्यांनी आता तरी ओळखायला हवे.