'निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी माजी पंतप्रधान ठरतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:01 AM2019-04-17T04:01:34+5:302019-04-17T04:02:08+5:30
लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे नंतर जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान ठरतील,असे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल मंगळवारी म्हणाले.
वडोदरा : लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे नंतर जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान ठरतील,असे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल मंगळवारी म्हणाले. एका खासगी समारंभात त्यांनी सांगितले की, सत्ताधारी भाजपच्या धोरणांमुळे जनतेचा छळवाद सुरू आहे. मात्र भाजप गुलाबी चित्र निर्माण करीत आहे. मात्र यंदा लोकांची दिशाभूल होणार नाही. कॉँग्रेस गुजरातमधील २६ पैकी १२ ते १५ जागा निश्चित जिंकेल.
पटेल म्हणाले की, महाआघाडी निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान ठरवतील. भाजपने निवडणूक प्रचारात देशातील जनतेला भेडसावणारे प्रश्न दूर ठेवून राष्ट्रवाद व दहशतवाद या पळवाटा काढल्या आहेत. भाजपने या दोन्ही विषयांबाबत कॉँग्रेसला काही सल्ला देण्याची गरज नाही. दहशतवादाविरोधात लढताना कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली. आम्ही दहशतवादाविरोधात कसा लढा द्यावा, याचे धडे भाजपने देऊ नयेत.’