शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मोदी वाराणसीसह बडोद्यातून लढणार?; भाजपचा तर्क-वितर्कांना विराम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 6:08 AM

वाराणसीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेची आगामी निवडणूक ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढविणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असताना भाजपने हा बेत रद्द केला आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : वाराणसीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेची आगामी निवडणूक ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढविणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असताना भाजपने हा बेत रद्द केला आहे. लोकसभेच्या २१ जागा असलेल्या किनारपट्टीवरील राज्य जिंकण्याच्या रणनीतीतहत मोदी हे पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असा तर्क लावला जात होता. तथापि, वाराणसीसोबत गुजरातमधूनही निवडणूक लढविण्याचा त्यांचा विचार आहे.काल मंगळवारी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पुरीमधून लोकसभेची निवडणूक लढविणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तथापि, मोदी यांनी या प्रश्नाला स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले होते. भाजपच्या सूत्रांनी ही योजना रद्द करण्यात आल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. पाच राज्यांत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा बेत बारगळला आहे.सूत्रानुसार वाराणसीसोबत दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातून मोदी निवडणूक लढविणार असतील तर निश्चित गुजरातमधील बडोदा मतदारसंघातून निवडणूक लढवितील. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ही जागा सोडली होती. नंतर पोटनिवडणुकीत रंजनबेन भट्ट येथून निवडून आल्या होत्या.तथापि, गांधीनगरमधून निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे ज्येष्ठ लालकृष्ण अडवाणी करतात. अडवाणी यांना लोकसभेचे तिकीट नाकारले जाऊ नये, अशी मोदी यांची इच्छा आहे. अडवाणींना तिकीट नाकारल्यास हा भावनात्मक मुद्या होऊ शकतो. अशा स्थितीत काय तोडगा काढता येईल, यासाठी मध्यस्थ काम करीत आहेत.मोदी यांनी पुन्हा गुजरातमधून लोकसभेची निवडणूक लढविल्यास लोकसभेच्या सर्व २६ जागा भाजप आपल्याकडे राखू शकते, असे मत भाजप नेतृत्वाने मोदी यांच्याकडे व्यक्त केले आहे.लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मोदी यांचा बेत नाही, असे स्पष्ट संकेत भाजपच्या श्रेष्ठींनी नवीन पटनायक यांंना दिल्याचे समजते. बिजू जनता दल काँग्रेसशी दोन हात दूर ठेवून असेपर्यंत बिजद सरकारसोबत भाजपला समस्या नाही.बिजदचा सशर्त प्रतिसादभाजपच्या संकेताला बिजदने सशर्त सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. माजी खासदार बी. जे. पांडा यांच्यासारख्या बंडखोरांची पाठराखण केली जाऊ नये, तसेच बिजद नेत्यांना सीबीआय आणि ईडीमार्फत खोट्या गुन्ह्यांत गोवून त्रास देऊ नये.दिल्लीच्या राजकारणात आम्हाला स्वारस्य नाही. दिल्लीने पूर्वेकडे नजरही टाकू नये, असे नवीन पटनायक यांनी म्हटले आहे. त्यामुळेच शारदा चिटफंडसह विविध घोटाळ्यांबाबत सीबीआय बिजद मंत्री आणि आमदारांविरुद्ध सबुरी राखून आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी