सीबीआय प्रमुखांना हटवले तरी मोदी वाचणार नाहीत, राहुल गांधींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 06:39 PM2018-10-26T18:39:48+5:302018-10-26T18:40:20+5:30

सीबीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाला आता राजकीय रूप मिळू लागले आहे.

Modi will not save even him if CBI chief is removed, Rahul Gandhi's warning | सीबीआय प्रमुखांना हटवले तरी मोदी वाचणार नाहीत, राहुल गांधींचा इशारा 

सीबीआय प्रमुखांना हटवले तरी मोदी वाचणार नाहीत, राहुल गांधींचा इशारा 

Next

नवी दिल्ली - सीबीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाला आता राजकीय रूप मिळू लागले आहे. काँग्रेसने या वादाचा संबंध राफेल विमान कराराशी जोडला असून, देशभरातील सीबीआय कार्यालयांसमोर आंदोलन केले. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या आंदोलनाची सूत्रे आपल्या हाती घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. सीबीआय प्रमुखांना हटवले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. 

सीबीआयप्रमुखांना हटवण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना आज अटक करण्यात आली होती. दरम्यान, लोधी कॉलनी पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर राहुल गांधी यांनी मोदींवर घणाघाती टीका केली. "मोदी पळू शकतात, लपू शकतात, पण शेवटी सत्य समोर येईलच. सीबीआय प्रमुखांना हटवल्यामुळे कोणताही फायदा होणार नाही. पंतप्रधानांनी सीबीआय प्रमुखांविरोधात कारवाई केली. ही अत्यंत घाईगडबडीने केलेली कारवाई आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 





  सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांचा वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील वातावरण तापले आहे. यातच पंतप्रधान मोदी यांनी राफेल घोटाळ्याची चौकशी थांबविण्यासाठी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच काँग्रेसकडून आज देशभरात आंदोलन करण्यात आले. 

Web Title: Modi will not save even him if CBI chief is removed, Rahul Gandhi's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.