बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात व्दिपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा होणार असून मोदी हे २७ व २८ एप्रिल रोजी वुहान शहरात एका अनौपचारिक शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती चीनचे विदेश मंत्री वांग यी यांनी रविवारी दिली.चीनमध्ये दाखल झालेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत वांग यी यांनी सांगितले की, राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी येणार आहेत. सुषमा स्वराज म्हणाल्या, या माध्यमातून परस्पर संवादाला चालना देण्याचा उद्देश आहे. व्दिपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांवर विचारविमर्श होणार आहे. येथे सोमवारपासून सुरु होणाºया शांघाई सहयोग संघटनेच्या (एससीओ) विदेश मंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीत सहभाग घेण्यासाठी स्वराज येथे आल्या आहेत. (वृत्तसंस्था)
२७ एप्रिलपासून मोदी जाणार चीनच्या दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:18 AM