मोदीजी, तुम्ही उत्तम मीडिया मॅनेजर; दिग्विजय सिंह यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 04:01 PM2019-06-21T16:01:29+5:302019-06-21T16:03:31+5:30

प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरिराच्या बनावटीच्या आधारावर योग्य योगा जाणकाराकडून योग आसन करायला हवीत. अन्यथा एखादं आसन त्या व्यक्तीला नुकसानकारक ठरू शकतं. योगाला आयुर्वेदाशी जोडणे योग्य ठरेल, असंही दिग्विजय सिंह यांनी नमूद केले.

Modiji, you are the best media manager says Digvijay Singh | मोदीजी, तुम्ही उत्तम मीडिया मॅनेजर; दिग्विजय सिंह यांचा टोला

मोदीजी, तुम्ही उत्तम मीडिया मॅनेजर; दिग्विजय सिंह यांचा टोला

googlenewsNext

नवी दिल्ली - देशभरात आज पाचवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आहे. याला अनुसरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी मोदींवर टीका केली आहे.

दिग्विजय सिंह ट्विटमध्ये म्हणाले की, तुमच्याविषयी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी खरच म्हणाले होते की, तुम्ही उत्तम इव्हेंट मॅनेजर आहात. तुमच्या यशाच हेच गुपीत आहे ना, असा सवालही दिग्विजय सिंह यांनी विचारले. योगाला तुम्ही प्रसिद्धी मिळवून देत आहात, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. मात्र तुम्ही याला मीडिया इव्हेंट देखील बनवत आहात. हे योग्य नसल्याचं देखील दिग्विजय सिंह यांनी म्हटले.

ध्यान आणि प्रणायामाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या शरिराच्या बनवटीवरच त्या व्यक्तीसाठी कोणतं आसन, ध्यान आणि प्रणायाम उपयुक्त ठरले, हे अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरिराच्या बनावटीच्या आधारावर योग्य योगा जाणकाराकडून योग आसन करायला हवीत. अन्यथा एखादं आसन त्या व्यक्तीला नुकसानकारक ठरू शकतं. योगाला आयुर्वेदाशी जोडणे योग्य ठरेल, असंही दिग्विजय सिंह यांनी नमूद केले.

दरम्यान दिग्विजय सिंह यांनी मोदींना टोला लगावता म्हटले की, अडवाणीजींनी खरच सांगितलं होत की, तुम्ही उत्तम इव्हेंट मॅनेजर आहात. त्यात मी भर घालू इच्छित असून तुम्ही इव्हेंटसह चांगले मीडिया मॅनेजर देखील आहात. तुमच्या यशाच हे कारण तर नाही ना, असा खोचक सवालही दिग्विजय सिंह यांनी मोदींना विचारला.

 

Web Title: Modiji, you are the best media manager says Digvijay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.