नवी दिल्ली : संसदेचे कामकाज ठप्प पाडणाऱ्या काँग्रेस पक्षाचा देशभरातील जनतेसमक्ष पर्दाफाश करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआच्या खासदारांना केले आहे. पंतप्रधानांनी संसदेचे कामकाज बंद पाडण्याची तुलना आणीबाणीशी करीत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. दुसरीकडे वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही संसदेचे कामकाज वाया जाण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले. आम्ही काँग्रेसचे हे लोकशाहीविरोधी आव्हान स्वीकारले आहे. आमचे लोक देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन देशाच्या विकासाला खीळ घालू पहाणाऱ्या काँग्रेसचा पर्दाफाश करतील. काँग्रेस पक्षाला एक कुटुंब वाचवायचे आहे. तर भाजपाला देश वाचवायचा आहे, असे मोदी म्हणाले. रालोआ संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीनंतर रालोआच्या खासदारांनी विजय चौक ते संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत ‘लोकशाही बचाव मार्च’ काढला.
काँग्रेसचा पर्दाफाश करण्याचे मोदींचे आवाहन
By admin | Published: August 14, 2015 12:56 AM