नितीन अग्रवाल,
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांसाठी दिवाळी स्नेहमिलनाचे आयोजन केले आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर ते दुसऱ्यांदा असा कार्यक्रम घेत आहेत. भाजपच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी झाली आहे. गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी २,५०० पत्रकार, संपादकांना निमंत्रणे पाठविली आहेत. पंतप्रधान पत्रकारांना एकत्र भेटण्याऐवजी स्वतंत्रपणे भेटणार आहेत. गेल्यावर्षी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात गोंधळ उडाला. तशी स्थिती यावेळी उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. तेव्हा पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्यासाठी पत्रकारांत चढाओढ लागून धक्काबुक्कीची वेळ आली होती.>मंत्र्यांनाही सल्लामोदींनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचा सल्ला दिला होता. मंत्री दरवर्षी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. प्रकाश जावडेकर, जे.पी. नड्डा, राधामोहनसिंह आणि डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमावर दिसून आला.