नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना खूश करण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. सरकारने २०१८-१९ वित्तीय वर्षासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) भरघोस वाढ जाहीर केली आहे. भाताच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीला जेमतेम एक वर्ष असताना त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींविषयक समितीने हा निर्णय घेतला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकºयी अस्वस्थ व संतप्त आहेत. महाराष्ट्रात आधारभूत किमत वाढवून देण्यासाठी गेल्या वर्षी जूनमध्ये शेतकरी संपही झाला होता. सरकारच्या आजच्या निर्णयामुळे शेतकºयांना दिलासामिळेल. हमीभावाच्या आश्वासनाची पूर्ततेसाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.भाताच्या किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटलला १५५० वरून १७५० रुपये करण्यात आली आहे. कापसाची किंमत प्रति क्विंटल ४०२० रुपयांवरुन ५१५० (मध्यम धागा) व ४३२० रुपयांवरुन ५४५० रुपये (लांब धागा) करण्यात आली आहे. डाळींची किंमत क्विंटलला ५४५० वरून ५६७५ रुपये करण्यात आली आहे. मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन आदी १४ पिकांच्या एमएसपीतही सुमारे ५0 ते ९६ टक्के वाढ केली आहे.४ वर्षांत वर्षांत किरकोळ वाढधानाच्या एमएसपीत २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षी क्विंटलला ५० रुपये वाढ, २०१६-१७ साठी ६० रुपये तर २0१७-१८ मध्ये ८0 रुपये वाढ देण्यात आली होती.स्वागतया निर्णयाचे योगेंद्र यादव, किसान सभेचे अजित नवले यांच्यासह अनेकांनी स्वागत करताना या शोतमालाची खरेदी सरकारने करावी, अशी आग्रही मागणीही केली.‘लोकमत’चे आवाहने किमान किंमत जाहीर झाली असली तरी सरकार ते सारे विकत घेत नाही आणि व्यापारी शेतमालाला त्याहून कमी भाव देतात. ते होणार नाही, याची दक्षता शेतकºयांनीच घ्यावी. बाजारभाव पडल्यास शेतकºयांना भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे कमी किमतीत धान्य विकावे लागल्यास सरकारकडून भरपाई मिळेल, यासाठी शेतकºयांनी जागृत राहायला हवे.शेतकºयांचे अभिनंदन : शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण केल्याचा मला आनंद होत आहे. किमान आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ केली आहे. मी शेतकºयांचे अभिनंदन करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधानमोदींचे आभार : केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
निवडणुकांच्या तोंडावर मोदींची शेतकऱ्यांना खूशखबर! १४ खरीप पिकांना दीडपट हमीभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 6:14 AM