मोदींच्या ‘जीडीपी’ शैलीने देशाचा ‘जीडीपी’ घसरला! राहुल गांधींची वक्रोक्तीपूर्ण टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:02 AM2018-01-07T00:02:49+5:302018-01-07T00:02:58+5:30

मोदी सरकारवर टीका करताना याआधी ‘जीएसटी’ला ‘गब्बर सिंग टॅक्स’ व ‘मेक इन इंडिया’ला ‘फेक इन इंडिया’ असे संबोधणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीडीपी’ या सकल राष्ट्रीय उत्पन्नासाठी वापरल्या जाणा-या इंग्रजी अद्याक्षरांवर ‘ग्रॉस डिव्हिझिव्ह पॉलिटिक्स’ अशी वक्रोक्तीपूर्ण कोटी शनिवारी केली व मोदींच्या शैलीमुळे देशाची अर्थव्यवस्था आज वाईट स्थितीत असल्याचा आरोप केला.

Modi's 'GDP' style declines country's GDP! Rahul Gandhi's apt comment | मोदींच्या ‘जीडीपी’ शैलीने देशाचा ‘जीडीपी’ घसरला! राहुल गांधींची वक्रोक्तीपूर्ण टीका

मोदींच्या ‘जीडीपी’ शैलीने देशाचा ‘जीडीपी’ घसरला! राहुल गांधींची वक्रोक्तीपूर्ण टीका

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : मोदी सरकारवर टीका करताना याआधी ‘जीएसटी’ला ‘गब्बर सिंग टॅक्स’ व ‘मेक इन इंडिया’ला ‘फेक इन इंडिया’ असे संबोधणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीडीपी’ या सकल राष्ट्रीय उत्पन्नासाठी वापरल्या जाणाºया इंग्रजी अद्याक्षरांवर ‘ग्रॉस डिव्हिझिव्ह पॉलिटिक्स’ अशी वक्रोक्तीपूर्ण कोटी शनिवारी केली व मोदींच्या शैलीमुळे देशाची अर्थव्यवस्था आज वाईट स्थितीत असल्याचा आरोप केला.
आगामी वित्तीय वर्षात देशाचा ‘जीडीपी’ वृद्धीदर कमी होऊन ६.५ टक्के असेल, असा अंदाज सरकारच्याच ‘सेंट्रल स्टॅटिस्टिकल आॅर्गनायजेशन’ने शुक्रवारी व्यक्त केला. त्यानिमित्त टिष्ट्वटरवरून सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनी एरवी अलौकिक प्रतिभावंत असा अर्थ असलेला ‘जीनियस’ हा शब्दही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना उद्देशून ‘चलाख’ या गर्भित अर्थाने वापरला.
गेल्या १३ वर्षांत सर्वात कमी नवी नवी गुंतवणूक, बँकांच्या वित्त पुरवठ्याची ६३ वर्षांतील सर्वात कमी पातळी, रोजगारनिर्मितीचा आठ वर्षांतील निचांक आणि कृषीक्षेत्राचा जेमतेम १.७ टक्के एवढा मामुली विकास यासोबत आठ वर्षांतील सर्वाधिक वित्तीय तूट आणि ठप्प झालेल्या विकास प्रकल्पांचा चढता आलेख, अशी देशाच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.
‘जीडीपी’ आणि ‘जीनियस’ या दोन शब्दांची नव्या अर्थाने गुंफण करत राहुल गांधी यांनी असा आरोप केला की, मोदी यांची फुटपाडू राजकारणाची शैली आणि जेटली यांची ‘चलाखी’ यामुळे अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाली आहे.
मोदींचा दावा उडाला हवेत!
अर्थव्यवस्था मंदावत असल्याची भीती खरी ठरली आहे. भारताचा दमदार आर्थिक विकास होत असल्याचा मोदी सरकारचा दावा कापरासारखा हवेत उडून गेला आहे. साखरेची कितीही पुटे चढविली आणि फुकाच्या बढाया मारल्या तरी कटू सत्य लपून राहात नाही. अलीकडच्या काळात देशात जाणवणारा सामाजिक असंतोष हे या आर्थिक मंदीचेच फलीत असू शकेल, असे माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम म्हणाले.

राहुल गांधींविरुद्ध हक्कभंगाची तक्रार
राहुल गांधी यांच्या विरोधात राज्यसभेत दाखल झालेली हक्कभंगाची तक्रार राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे पाठविली आहे. राज्यसभेतील भाजप सदस्य भूपेंदर यादव यांनी हक्कभंगाची तक्रार केली होती.
राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या आडनावाचे स्पेलिंग बदलून ‘जेटलाय’ (खोटे बोलणारे जेटली) करूनअवमान केल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. राहुल यांच्या विरोधातील आणखी एक तक्रार लोकसभेच्या आचार संहिता समितीसमोर आहे. ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी समितीचे अध्यक्ष आहेत.

Web Title: Modi's 'GDP' style declines country's GDP! Rahul Gandhi's apt comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.