नवी दिल्ली : राज्यसभेतील ५५ सदस्यांचा कार्यकाल एप्रिल महिन्यामध्ये संपत असून, त्यात अरुण जेटली, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद या सहा मंत्र्यांचा समावेश आहे. त्यांचे भवितव्य पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती आहे. सचिन तेंडुलकर, जया बच्चन, रेखा, चिरंजीवी, हे नामवंतही एप्रिलमध्ये निवृत्त होत असून, महाराष्ट्रातील वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील, राजीव शुक्ला (काँग्रेस), अजय संचेती (भाजपा), अनिल देसाई (शिवसेना) यांचाही त्यात समावेश आहे.केंद्रीय राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचीही मुदत संपत आहे. भाजपाला राज्यसभेमध्ये बहुमत नसल्याने अनेकदा पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागते. भाजपाला महत्त्वाची वाटणारी विधेयके लोकसभेमध्ये मंजूर होऊनही ती राज्यसभेत विरोधकांकडून अडविली जात असल्याने मोदी सरकारच्या अडचणींत भर पडली आहे. त्यामुळे अशा विधेयकांचे काही वेळा वटहुकूम काढावे लागतात.शिवसेनेचे अनिल देसाईयांची मुदत २ एप्रिल संपत आहे. सपाचे नरेश अग्रवाल, भाजपाचे वादग्रस्त नेते विनय कटियार, सत्यव्रत चतुर्वेदी, प्रमोद तिवारी हे सदस्यही एप्रिलमध्ये निवृत्त होतील. राज्यसभा नियुक्त अभिनेत्री रेखा, सचिन तेंडुलकर व अनु आगा यांचीही मुदत संपणार आहे.>भाजपासाठी बिकट वाट : आंध्रातील तेलगू देसम भाजपावर नाराज आहे. त्याची राज्यसभा निवडणुकीत भाजपाला कितपत साथ मिळेल याविषयी शंका आहे. भाजपाला सर्वांत मोठे आव्हान आहे बिहारमध्ये. त्या राज्यात जनता दल (यू)व भाजपा यांचे सरकार असले तरी राज्यसभा निवडणुकीत नितीश कुमार भाजपाला मदत करतील का, असा प्रश्न आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांवर भाजपाची मदार असेल. तेथून कुमक व पाठबळ मिळेल याची भाजपाला खात्री आहे. काँग्रेस, बसपा, सपा, तृणमूल काँग्रेस, तेलगु देसम पक्ष हे आपल्या जागा कमी होणार नाहीत यासाठी प्रयत्न करतील. त्यांचे हे प्रयत्न भाजपाच्या मिशन राज्यसभाच्या मार्गात अडचणी निर्माण करू शकते.>५५ खासदारांची नावे, पक्ष, राज्य व निवृत्तीखासदाराचे नाव पक्ष राज्यनरेश अग्रवाल सपा उत्तर प्रदेशमुनकद अली बसपा उत्तर प्रदेशजया बच्चन सपा उत्तर प्रदेशविनय कटियार भाजपा उत्तर प्रदेशकिरणमय नंदा सपा उत्तर प्रदेशदर्शनसिंह यादव सपा उत्तर प्रदेशआलोक तिवारी सपा उत्तर प्रदेशप्रमोद तिवारी काँग्रेस उत्तर प्रदेशचौ. मुनव्वर सलीम सपा उत्तर प्रदेशवंदना चव्हाण राष्ट्रवादी महाराष्ट्रअनिल देसाई शिवसेना महाराष्ट्ररजनी पाटील काँग्रेस महाराष्ट्रअजय संचेती भाजपा महाराष्ट्रराजीव शुक्ला काँग्रेस महाराष्ट्रडी. पी. त्रिपाठी राष्ट्रवादी महाराष्ट्रएल. गणेशन भाजपा मध्य प्रदेशथावरचंद गहलोत भाजपा मध्य प्रदेशमेघराज जैन भाजपा मध्य प्रदेशसत्यव्रत चतुर्वेदी काँग्रेस मध्य प्रदेशकुणालकुमार घोष तृणमूल पश्चिम बंगालविवेक गुप्ता तृणमूल पश्चिम बंगालमोहम्मद नदीमुल हक तृणमूल पश्चिम बंगालतपनकुमार सेन भाकप पश्चिम बंगालप्रकाश जावडेकर भाजपा मध्य प्रदेशदेवेंद्र गौड टी. टीडीपी आंध्र प्रदेशडॉ. के. चिरंजीवी काँग्रेस आंध्र प्रदेशरेणुका चौधरी काँग्रेस आंध्र प्रदेश>खासदाराचे नाव पक्ष राज्यराजीव चंद्रशेखर अपक्ष कर्नाटकबसवराज पाटील भाजपा कर्नाटकरामकृष्ण रंगासाइ भाजपा कर्नाटकके. रहमान खान काँग्रेस कर्नाटकशंकरभाई एन. वेगड भाजपा गुजरातअरुण जेटली भाजपा गुजरातमनसुखलाल मांडविया भाजपा गुजरातपुरुषोत्तम रुपाला भाजपा गुजरातडॉ. महेंद्र प्रसाद जद (यू) बिहारधर्मेंद्र प्रधान भाजपा बिहाररविशंकर प्रसाद भाजपा बिहारडॉ. अनिलकुमार साहनी जद (यू) बिहारवशिष्ठ नारायण सिंह जद (यू) बिहारनरेंद्र बुढानिया काँग्रेस राजस्थानडॉ. अभिषेक मनु संघवी काँग्रेस राजस्थानभूपेंदर यादव भाजपा राजस्थानए. यू. सिंह देव बिजद ओदिशाए. व्ही. स्वामी अपक्ष ओडिशादिलीपकुमार टिकी बिजद ओडिशासी. एम. रमेश टीडीपी तेलंगणाआनंदभास्कर रापोलू काँग्रेस तेलंगणाडॉ. भूषणलाल जांगडे भाजपा छत्तीसगढमहेंद्रसिंह महरा काँग्रेस उत्तराखंडजगतप्रसाद नड्डा भाजपा हिमाचलशादीलाल बत्रा काँग्रेस हरियाणाअनू आगा नामनियुक्तरेखा गणेशन नामनियुक्तसचिन तेंडुलकर नामनियुक्त
सहा वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य मोदींच्या हाती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 3:58 AM