ऑनलाइन लोकमत
तेल अव्हिव, दि, 6 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्राइलमधील भारतीयांना संबोधित करताना प्रगतीच्या दिशेने झेपावणाऱ्या युवा भारताचे चित्र सादर केले. तसेच इस्राइलच्या ऐतिहासिक भेटीवेळी दिल्ली-मुंबई-तेल अव्हिव विमानसेवा, इस्राइलमध्ये इंडियन कल्चरल सेंटरची स्थापना आणि ज्या भारतीयांनी इस्राइलमध्ये अनिवार्य लष्करी सेवा दिली आहे अशांसाठी ओसीआय कार्ड देणे अशा महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी यावेळी केल्या. यावेळी भारतीय पंतप्रधानांच्या पहिल्या इस्राइल दौऱ्याला 70 वर्षे लागल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- दिल्ली, मुंबई, तेल अव्हीव दरम्यान विमानसेवा सुरू करण्यात येईल
- भारत आणि इस्राइल मानवी मुल्ये आणि वारशाचे भागीदार
- भारत सरकार इस्राइलमध्ये लवकरच इंडियन कल्चरल सेंटर सुरू करणार
- इस्राइलमध्ये राहणारे भारतीय शौर्य आणि शांततेचे प्रतीक
- इस्राइलमध्ये विद्यार्थी जे काही शिकतील त्याचा भारताला फायदा होईल
- भारत आणि इस्राइलमधील संबंधांचा प्रमुख आधार इनोव्हेशन आणि रिसर्च आहे
- इस्राइलमध्ये शिकत असलेले भारतीय विद्यार्थी भारत आणि इस्राइलमधील दुवा
- दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेले देश आपल्या पायावर उभे राहिले, कारण त्यांनी तरुणांच्या कौशल्य विकासावर काम केले
- 2022 साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी देशातील प्रत्येक कुटुंबाकडे घर, घरात वीज आणि पाणी असावे हे माझे स्वप्न
- आम्ही देशात जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एकच कर लागू होणार
- भारत सध्या जगातील वेगाने विकसित होणारा देश आहे, इन्फॉर्म, रिफॉर्म आणि परफॉर्म हा माझ्या सरकारचा मंत्र
- ज्यू लोकांची भारतातील संख्या मर्यादित आहे, पण त्यांनी विविध क्षेत्रात आपली छाप पाडली आहे
- भारतातील आकाशवाणीची सिग्नेचर ट्युन वॉल्टर कॉपमेन यांनी बनवली
- ज्यू धर्मीय ई. मोझेस यांनी 1938 साली मुंबईचे महापौरपद भूषवले होते
- इस्राइलमध्ये मराठी नियतकालिक मायबोलीचे प्रकाशन होते हे ऐकून आनंद झाला
- इस्राइलच्या पहिल्या पंतप्रधानांनी वाळवंटात हिरवळ फुलवण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा भारतातून आलेल्या ज्यू नागरिकांनी त्यासाठी दिवस/रात्र एक केली
- मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानला अर्ध्या तासात शरणागती पत्करण्यास लावणाऱ्या लेफ्टनंट जनरल जेकब यांचा केला उल्लेख
- इस्राइलच्या शौर्याला प्रणाम, त्यांचे हेच शौर्य त्यांच्या विकासाचा आधार आहे
- भारत आणि इस्राइलमधील सणांसमध्ये समानता , भारतात होळी साजरी केली जाते, तर इस्राइलमध्ये परिम साजरा केला जातो
- इस्राइलच्या पंतप्रधानांना भारतीय आहाराबाबत असलेली आवड प्रत्येक भारतीयाच्या मनात भरणारी