नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरुन भाषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी भाषणासाठी जनतेतून सूचना मागविल्या आहेत.याबाबत सरकारी वेबसाईटवरून देण्यात आलेल्या संदेशात म्हटले की, स्वातंत्र्यदिनानिमित्तचे भाषण यावर्षीचे सर्वात महत्वपूर्ण भाषण असेल. यासाठी थेट नागरिकातून विचार, सूचना मागविण्यात आल्या आहेत. याहीवर्षी पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना विचार पाठविण्याचे आवाहन केले. नागरिकांनी सूचना माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नरेंद्र मोदी यांच्या साईटवर व मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदी यांचे स्वातंत्र्य दिनीचे भाषण सूचनांवर आधारित!
By admin | Published: August 12, 2016 3:08 AM