शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मोदींची नावीन्यपूर्ण मुत्सद्दीगिरी

By admin | Published: December 27, 2015 2:48 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काबुलहून मायदेशी परतताना पाकिस्तानात लाहोर येथे उतरणार असल्याची आपल्यालाही कल्पना नव्हती. पंतप्रधानांनी स्वत: फोन केला तेव्हाच आपल्याला

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काबुलहून मायदेशी परतताना पाकिस्तानात लाहोर येथे उतरणार असल्याची आपल्यालाही कल्पना नव्हती. पंतप्रधानांनी स्वत: फोन केला तेव्हाच आपल्याला हे समजले, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे सांगितले व मोदींची ही भेट म्हणजे ‘नावीन्यपूर्ण मुत्सद्दीगिरी’ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाचे अभीष्टचिंतन करण्यासाठी मोदी यांनी अचानक लाहोरला जाण्याने सर्वच जण चकित झाले होते. रा. स्व. संघाच्या राज्य मुख्यालयात आयोजित ‘जन संवाद’मध्ये बोलताना याचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व मी असे दोघे माझ्या सरकारी निवासस्थानाच्या हिरवळीवर बसलो होतो, तेव्हा पंतप्रधानांनी फोन करून आपण पाकिस्तानला जात असल्याचे सांगितले. मोदीजींच्या या निर्णयाने आम्हाला आश्चर्य वाटले. गृहमंत्री म्हणाले की, ‘उभय देशांमध्ये राजनैतिक मुत्सद्दीगिरी सुरू असते व प्रत्येक देश हेच करीत असतो, पण मोदींनी लाहोरला जाऊन जे केले, ती नावीन्यपूर्ण मुत्सद्दीगिरी होती. संयुक्त राष्ट्र संघात गेले असता, सर्व सदस्य देशांना योगाचे महत्त्व पटवून देऊन, पंतप्रधानांनी जागतिक योग दिन जाहीर करून घेताना, जी सांस्कृतिक मुत्सद्दीगिरी दाखविली, तशीच ही मुत्सद्दीगिरी होती. नंतर पत्रकारांनी पाकिस्तानविषयीची ताठर भूमिका एकदम मवाळ कशी झाली, असे विचारले असता, राजनाथ सिंग म्हणाले, परराष्ट्र संबंधांतील राजनैतिक मुत्सद्दीगिरीत चढ-उतार हे होतच असतात. पाकिस्तानशी जेवढे जास्त बोलू, तेवढे देशासाठी चांगले असल्याने वाटाघाटींचा मार्ग बंद केला जाणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.अमेरिका, युनोकडून स्वागतभारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारल्याचा संपूर्ण प्रदेशाला लाभ होईल, असे सांगत, अमेरिका व संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सरप्राइज’ पाकिस्तान भेटीचे स्वागत केले आहे. मोदींच्या पाक भेटीचे आम्ही स्वागत करतो, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले. युनोचे सरचिटणीस बान की मून यांनीही मोदी-नवाज शरीफ भेटीचे स्वागत केले आहे.हे अगदी एखाद्या मुत्सद्याला साजेसे झाले. पडोसी से ऐसे ही रिश्ते होने चाहिये.- सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री (टिष्ट्वटरवर)