मोदींच्या लेह दौऱ्यावरुन काँग्रेसचा निशाणा, इंदिरा गांधींचा फोटो शेअर केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:08 PM2020-07-03T13:08:46+5:302020-07-03T13:10:09+5:30

भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते.

From Modi's Leh tour, the Congress is the target, Indira Gandhi's photo was shared and ... | मोदींच्या लेह दौऱ्यावरुन काँग्रेसचा निशाणा, इंदिरा गांधींचा फोटो शेअर केला अन्...

मोदींच्या लेह दौऱ्यावरुन काँग्रेसचा निशाणा, इंदिरा गांधींचा फोटो शेअर केला अन्...

Next
ठळक मुद्दे भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते.काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर केला आहे.

नवी दिल्ली : भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. मोदींच्या या लेह दौऱ्यावरुन काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर केला आहे.

भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते. तेथे ते एलएसीवरील सुरक्षेचा आढावा घेणार होते. मात्र, मोदी यांनी अचानक भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बिपिन रावतदेखील असून त्यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले. मोदींकडून चीनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची भेट घेऊन विचारपूस करण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावरुन काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी इंदिरा गांधीचा फोटो शेअर करुन, आता पाहुयात मोदी काय करतात? असा प्रश्न विचारला आहे. 

मनिष तिवारी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये इंदिरा गांधी देशातील जवानांना संबोधित करताना दिसत आहेत. या फोटोसोबत मनिष तिवारी यांनी लिहिले आहे की, जेव्हा इंदिरा गांधी लेह भेटीला गेल्या होत्या, त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. आता, पाहुयात मोदीजी काय करतात? असा खोचक टोला काँग्रसने लगावला आहे. इंदिरा गांधींचा हा फोटो 1971 च्या युद्धापूर्वीचा असून त्यांनी लेह येथे देशाच्या सैन्याला संबोधित केले होते. 

दरम्यान, मोदींनी लडाखमधील निमूमध्ये अचानक दिलेल्या भेटीनंतर आयटीबीपी, हवाई दलाच्या जवानांसोबत चर्चा केली.  हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 11,000 फुटांच्या उंचीवर आहे. सिंधू नदीच्या काठावर भारतीय जवानांचा कँप आहे. मोदी चीनवर एकानंतर एक वार करत आहेत. भारताच्या सरकारी कंपन्यांना ४जी कंत्राटे रद्द करण्याचे आदेश, रेल्वेला चीनच्या कंपनीसोबतचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते. यानंतर 69 अॅपवर बंदी आणली होती. तसेच बुधवारी रशियाकडून तातडीने 33 लढाऊ विमाने मिळविण्यासाठी चर्चाही केली होती. 
 

Web Title: From Modi's Leh tour, the Congress is the target, Indira Gandhi's photo was shared and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.