- शीलेश शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातच्या प्रचारातील भाषणे पाहता, त्यांची मानसिक अवस्था ठिक दिसत नाही, अशी टीका काँग्रेसने सोमवारी केला. मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पंतप्रधान करीत आहेत, असेही काँग्रेसने ऐकवले.पंतप्रधानांच्या भाषणाला उत्तरे देण्यासाठी राहुल गांधी जी भाषणे तयार करीत आहेत, त्यात काँग्रेसने गुजरातमध्ये सत्तेत असताना केलेल्या कामांचा उल्लेख असेल. काँग्रेसने ज्या महत्त्वाच्या संस्थांनी उभारणी केली, त्यांची ती माहिती देतील आणि काँग्रेसच्या गुजरातमधील महत्त्वाच्या नेत्यांचाही ते उल्लेख करतील.मोदी यांनी गुजरातमध्ये विकास न होण्यास जवाहरलाल नेहरू जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी पंतप्रधानांवर कडाडून हल्ला चढवला.शर्मा म्हणाले की, अमूल डेरी, आयआयएम, राष्ट्रीय डिझाइन संस्था, गांधीनगरमध्ये जन आयआयटी, फॅशन टेक्नॉलॉजी संस्था, ओएनजेसी यासारख्या असंख्य महत्त्वाच्या संस्था काँग्रेस सत्तेत असतानाच गुजरातमध्ये आल्या. असे असूनही आपणच सत्तेत आल्यावरच हे सारे गुजरातमध्ये आले, अशी खोटी माहिती मोदी देत आहेत.पंतप्रधान झाल्यानंतर काय कामे केली, हे मोदी का सांगत नाहीत?, असा सवाल करून शर्मा म्हणाले की, स्वत:ला प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र स्वत:च देणे हास्यास्पद आहे. अशी प्रमाणपत्रे स्वत:लाच घेऊ न पंतप्रधान सरकारमधील घोटाळे लपवू पाहत आहेत. संसदेचे अधिवेशन टाळून सरकार आपल्या घोटाळ्यांची माहिती दडवू पाहत आहे.प्रत्येक आरोप खोडून काढणारमतदानाला काही दिवसच शिल्लक असल्याने काँग्रेस व भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी व टीकास्त्रे अधिक धारदार होतील, हे स्पष्ट दिसत आहे. मोदी यांच्या दौºयानंतर राहुल गांधी पुन्हा एकवार गुजरातेत जाणार असून, तिथे ते प्रत्येक आरोप खोडून काढतील.
मोदी यांची मानसिक स्थिती बिघडली, काँग्रेसचा आरोप; राहुल गांधी दौ-यात चढवणार हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:50 AM