शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मोदींचे ‘पीस मिशन’

By admin | Published: May 19, 2016 5:29 AM

मोदींच्या डोक्यात सध्या ‘पीस मिशन’ असून, शांतता आणि सलोख्यासाठी खास मंत्रालय स्थापन करण्यासोबतच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेतही मिळाले

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यात सध्या ‘पीस मिशन’ असून, शांतता आणि सलोख्यासाठी खास मंत्रालय स्थापन करण्यासोबतच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेतही मिळाले आहेत. मंत्रिमंडळाच्या खांदेपालटाचा अंक पार पाडला जाईल, तेव्हा शांतता मंत्रालयाची घोषणा केली जाऊ शकते, असे त्यांच्या निकटस्थ सूत्रांनी सांगितले आहे.गृहमंत्रालयाच्या अखत्यारित जातीय सलोख्यासाठी स्थापन करण्यात आलेला आयोग अपेक्षित उद्दिष्ट साध्य करू शकला नसल्याचे मोदींना वाटते. विविध समुदायांमध्ये सलोखा आणि शांतता राखण्यात अल्पसंख्यक मंत्रालयालाही यश मिळालेले नाही. त्यामुळे स्वतंत्र शांतता मंत्रालयच हा उद्देश साध्य करू शकेल, असा मोदींना विश्वास आहे. नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातला मोदींनी भेट दिली, त्यावेळी वेगवेगळ्या स्वरूपात अशी मंत्रालये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तूर्तास मोदींच्या डोक्यातील ही कल्पना अगदी बाल्यावस्थेत असून, अद्याप पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ)त्यासंबंधी आराखड्याचा विचारही केलेला नाही. शांतता आणि समाधान मंत्रालय स्थापन करण्याची कल्पना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी गेल्या महिन्यात मोदींची भेट घेतली, त्या वेळी मांडली होती. राज्यातील जनतेच्या समाधानाचा आलेख मोजण्यासाठी तसा विभाग स्थापन करण्याची घोषणा करण्याचा विचार चौहान यांनी या भेटीत बोलून दाखविला होता.>मोदी जाणार मंत्र्यांच्या दारी.....आश्चर्याची बाब म्हणजे, मोदींनी सहा ज्येष्ठ मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जात संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, वाहतूकमंत्री नितीन गडकरी, विदेशमंत्री सुषमा स्वराज आदींचा त्यात समावेश आहे. या आधी मोदी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानालाच भेट देत असत. अलीकडे त्यांनी स्वराज यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पायधूळ झाडली होती. संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानीही ते अधूनमधून जात होते.मंत्र्याशी संवादाविना निर्णय घेण्याचा भाग आता इतिहासजमा होणार आहे. अलीकडेच मोदींनी या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांसोबत चर्चेची पहिली फेरी पूर्ण केली आहे. मोदींच्या शांतता मंत्रालयाच्या भाग म्हणून मोदींनी पीस मिशन अवलंबले असावे.भोजन बैठकींतून मंत्र्यांशी संवाद...शांतता मंत्रालय कधीही स्थापन होवो. सध्या तरी मोदींनी वैयक्तिक पातळीवर पीस मिशन चालविले आहे, ते डीनर डिप्लोमसी सुरू करीत. ज्येष्ठ मंत्र्यांशी समोरासमोर थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी भोजन बैठकींची मालिका चालविली आहे. मोदींचा आपल्यावर विश्वास नाही, निर्णयापूर्वीही ते आपल्याशी सल्लामसलत करीत नाही, अशी खंत दीर्घ काळापासून मंत्र्यांना वाटते आहे.